शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चार्जिंगसाठी मैलभर पायपीट

By admin | Updated: November 15, 2015 02:24 IST

सातपुड्यातील आदिवासी अन् पायपीट ठरलेली आहे. कधी पोटाची खळगी भरण्यासाठी, तर कधी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील किंवा जिल्हा कचेरीच्या ठिकाणी त्यांना फेरफटका मारावा लागतो

रमाकांत पाटील,  नंदुरबारसातपुड्यातील आदिवासी अन् पायपीट ठरलेली आहे. कधी पोटाची खळगी भरण्यासाठी, तर कधी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील किंवा जिल्हा कचेरीच्या ठिकाणी त्यांना फेरफटका मारावा लागतो. स्वातंत्र्यानंतर सहा दशके लोटल्यानंतरही दळणवळणाची साधने न पोहोचलेल्या भागात सध्या मोबाइलचे टॉवर पोहोचल्याने संपर्काचा बोलबाला वाढलाय. मात्र, वीज न पोहोचल्याने आदिवासींना चार्जिंगसाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे.सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील जवळपास ७० पेक्षा अधिक गावे आणि एक हजारांवर पाड्यांपर्यंत रस्तेच नाहीत, तर इतर सुविधांबाबत न बोललेलेच बरे. काही मध्यवर्ती गावांपर्यंत मोबाइलचे टॉवर पोहोचल्याने, त्याच्या परिसरातील पाड्यांवर तरुणांच्या हातात मोबाइल फोन दिसू लागले आहेत. मात्र, वीज नसल्याने चार्जिंगचा मोठा प्रश्न येथे आहे.सातपुड्यातील कंजाला, कौवलीमाळ, सिंदगव्हाण, जांगठा या चार गावांसह नर्मदा काठावरील गावे आणि ७०० च्या वर पाड्यात अजून वीज पोहोचलेली नाही. काही गावांत वीज पोहोचली, पण तांत्रिक अडचणी सातत्याने उद्भवत असल्याने, अनेक ठिकाणी बहुसंख्य वेळ वीजपुरवठा खंडितच असतो. त्यामुळे मोबाइलधारक चार्जिंगसाठी मध्यवर्ती गावात येतात. हे नित्याचेच झाले आहे. मोलगी, धडगाव, अक्कलकुवा गावांमध्ये रोज वाड्या-वस्त्यांवरून मोबाइल चार्जिंग करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोबाइल चार्जिंगमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. गावांमधून दोन-चार तरुण केवळ मोबाइल चार्जिंग करण्यासाठी मध्यवर्ती गावांमध्ये जातात. अनेक गावांना रस्ते नसल्याने या तरुणांना पाच ते १० किलोमीटरची पायपीटही करावी लागते. हे तरुण गावातील मोबाइल एकत्र करून घेऊन येतात. त्याचा त्यांना मोबदलाही मिळतो, तर दुसरीकडे मोलगी, धडगाव, अक्कलकुवा या गावांमध्ये काही व्यावसायिकांनी मोबाइल चार्जिंग करून देण्याचा व्यवसायच सुरू केला आहे.प्रत्येक मोबाइल चार्जिंगसाठी १० ते १५ रुपये आकारले जातात. या व्यावसायिकांकडे एकाच वेळी १० ते १५ मोबाइल चार्जिंग करण्याची सुविधा आहे. माझ्या बर्डीपाडा गावात वीज नसल्याने मोबाइल चार्जिंगसाठी जवळपास १५ ते २० किलोमीटर लांब मोलगीला यावे लागते. त्यासाठी दिवस वाया जातो. त्यामुळे गावातील मोबाइल धारकांनी गट तयार केला असून, सर्वांचे मोबाईल एकत्र करून आम्ही चार्जिंगला पाठवतो.- रमेश तडवी, बर्डी, ता.अक्कलकुवा