शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘म’ मातृभाषेचा

By admin | Updated: February 20, 2015 23:03 IST

जगभरात २१ फेबु्रवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

नवी मुंबई : जगभरात २१ फेबु्रवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२ साली याच दिवशी बांगला भाषेला पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळावी म्हणुन ढाका मधील विद्यार्थ्यांनी तिथल्या सरकार विरोधी निदर्शने करुन आपल्या मातृभाषेसाठी हौताम्य पत्करले आणि म्हणूनच युनेस्कोने हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन घोषित केला. माणसाच्या दैनंदिन आयुष्यात, त्याच्या वैचारीक जडण-घडणीत मातृभाषेला सर्वात महत्त्वाचे स्थान असते. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याला जरी इंग्रजीचे पुरेपुर ज्ञान असले तरीही, तो विचार मात्र आपल्या मातृभाषेतच करतो. सध्या टेक्नोसॅव्ही आयुष्य जगणा-या माणसाला आपल्या मातृभाषेचाच विसर पडत चालला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणा-या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये मातृभाषेचा वापर केल्यावर त्या विद्यार्थ्यांला कमी लेखण्यात येते. कॉलेजमध्ये हिंदी, इंग्रजीचा वापर न करणा-या विद्यार्थ्याला मग गावठी या शब्दाचा टॅग लावण्यात येतो. हे एक नवीनच खूळ कॅम्पसमध्ये नक्की दिसेल...भाषा म्हणजे काय?या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे असेल तर....संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम असे देता येईल. वैचारिक देवाण-घेवाण आणि चारचौघात आपली भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणजेच भाषा. मग ही भाषा इंग्रजी, हिंदी,मराठी, बंगाली, पंजाबी, तामिळ..अशी कोणतीही असू शकते. खर सागंयचे झाले तर संवादासाठीच भाषेचा शोध लागला असे म्हणायला हरकत नाही. या भाषेत एवढी ताकद आहे की, आज ही आपल्या जीवनशैलीचा एक अतिमहत्त्वाचा भाग होऊन बसली आहे. निरक्षरतेला लढा देण्यासाठी आणि सांस्कृतिक वैविध्य जपण्यासाठी मातृभाषा खूप महत्त्वाची कामगिरी बजावते.भाषेमध्ये एवढे प्रभुत्व आहे की आपल्याला ती व्यक्त करताना कोणीही बंधने घालू शकत नाही...एकंदरीतच ती आपल्या मूल जन्मल्यापासूनच त्याच्यात रुजत जाते. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर, मराठी घरातल्या एका लहान मुलाला जेव्हा आपण नाच रे मोरा आणि जॉनी जॉनी या दोन्ही वेगवेगळ््या भाषेतल्या कविता एकत्र शिकवतो तेव्हा ते मुलाला नाच रे मोरा हे गाणं जास्त जिव्हाळ््याचे वाटते आणि तो ते पटकन शिकतो. याचेच कारण म्हणजे रोज मराठी शब्द कानावर पडत असल्याने त्याला आपसुकच त्या भाषेविषयी प्रेम वाटू लागते...तर जॉनी जॉनी शिकताना त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेण्यापासून त्याला तयार व्हावे लागते.या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी आणि गरजेपोटी भाषेचा वापर केला जातो. भाषेकडेही व्यावसायिक आणि वास्तववादी दृष्टीकोनातूनच पाहिले जाते. जाणून घेऊया वेगवेगळ््या वयोगटातील व्यक्तींचे आपल्या मातृभाषेबद्दल काय मत आहे? मराठी या भाषेमध्ये एवढा शब्दभंडार आहे की इतर कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला एवढी शब्दसंपत्ती पहायला मिळणार नाही. काळानुरुप होणा-या बदलामूळे भाषेचा वापर कमी झाला आहे. मुलांना मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणुन वाचन, कविता पठण, म्हणी यांची मी सवय लावली आहे. मी स्वत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून मराठी शब्दांचाच वापर करते.- अनिता कासारे,शिक्षिका मला मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो. सध्या माझ्या सारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या मातृभाषेचे जतन केले पाहिजे. मी स्वत: माझे पदवीचे शिक्षण मराठी भाषेत घेत आहे आणि पुढेही एक चांगली मराठी लेखक व्हायची माझी इच्छा आहे.-शीतल शिंदे, पत्रकारीता विद्यार्थीनीतंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे आणि त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार भाषा ही बदलणारचं...आणि याचा स्विकार केलाच पाहिचे. संस्कृती बद्दल बोलायच झाले तर मग आजही आपल्याला आपल्या मातृभाषेतली जुनी काव्य, साहित्य, कादंब-या आॅनलाईन वाचता येतात त्यामुळे मातृभाषेबरोबरीनेच इतरही भाषेचे ज्ञान महत्त्वाचे आहे .-प्रसून सहा, नोकरीमातृभाषेविषयी सांगताना मला एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे ,नुसताच शब्दभंडार असून उपयोगी ठरत नाही. आपण वापरलेले शब्द जर समोरच्याला कळलेच नाही तर त्या शब्दश्रीमंतीचा काय उपयोग नाही. यशवंत दिडवाघ , मुक्तपत्रकारसध्याची परिस्थिती पाहता मला आपल़्या मातृभाषेविषयी खूपच खंत वाटते. माझी मातृभाषा उडीया आहे. पण मला सोशल मिडियाशी कनेक्टेड राहायचे असेल तर इंग्रजी येणे आवश्यक आहे आणि माझ्या भाषेत संवाद साधता येत नाही. स्मिता मोहंती, गृहिणीमी सध्या जर्मन भाषा शिकतेय. ही भाषा शिकण्यात मला काही वावगं वाटत नाही. माझ़्या घरात मी आई-बाबांशी संवाद साधण्यासाठी माझी मातृभाषा वापरते हे पुरेसे आहे. मातृभाषा आलीच पाहिचे असे मला वाटते पण त्याचबरोबरीने इतर भाषांचे ज्ञानही तेवढेच महत्त्वाचे आहे. - दीप्ती ठाकुर, विद्यार्थीनीभाषा म्हणजे काय?या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे असेल तर....संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम असे देता येईल. वैचारीक देवाण-घेवाण आणि चारचौघात आपली भावनौ व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणजेच भाषा. मग ही भाषा इंग्रजी,हिंदी, मराठी,बंगाली,पंजाबी,तामिळ..अशी कोणतीही असू शकते. खर सागंयचे झाले तर संवादासाठीच भाषेचा शोध लागला असे म्हणायला हरकत नाही. या भाषेत एवढी ताकद आहे की, आज ही आपल्या जीवशैलीचा एक अतिमहत्त्वाचा भाग होऊन बसली आहे. निरक्षरतेला लढा देण्यासाठी आणि सास्कृंतिक वैविध्य जपण्यासाठी मातृभाषा खूप महत्त्वाची कामगिरी बजावते.असेही म्हटले जाते की आपल्या मातृभाषेत शिकलेला माणूस हा अधिक प्रगल्भपणे विचार करू लागतो. त्याउपर म्हणजे इतर भाषेत झालेले शिक्षण हे आपल्याला इतर जगाची माहिती देण्यास किंवा विचार करावयास लावण्यास अपूर्नच ठरत असते, त्यामुळे मातृभाषेत प्राथमिक अवस्थेतील झालेले शिक्षण हेच पूरक शिक्षण मानले जाते.