शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला

By admin | Updated: April 14, 2017 02:27 IST

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र स्टॉलधारकांकडून खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्याचे समोर आले

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र स्टॉलधारकांकडून खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने मध्य रेल्वेने स्टॉलधारकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. मध्य रेल्वेवरील ८५ पैकी ३५ स्टॉलधारकांवर दंड आकारण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या २७ गाड्यांमधीलही पेण्ट्री कारची तपासणी करण्यात आली असता आठ गाड्यांमधील पेण्ट्री कारमध्ये खाद्यपदार्थाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले. त्यामुळे कंत्राटदारांना चांगलीच जरब बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकांवर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील पदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. अस्वच्छता, पदार्थांची चव बरोबर नसणे, पदार्थांचे दर अधिक असणे इत्यादी कारणांमुळे स्थानकांवरील स्टॉल नेहमीच चर्चेत राहतात. त्याविरोधात रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांकडून तक्रारीही केल्या जातात. याकडे गेल्या काही वर्षात दुर्लक्ष केले जात असतानाच मध्य रेल्वेवरील विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदी नव्याने आलेल्या पंकज ऊके यांनी प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेतली. त्यानुसार १७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत स्टॉलधारकांवर कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर मध्य रेल्वेच्या मुंबईतील महत्वाच्या स्थानकातील ८५ स्टॉलची तपासणी केली. यातील ८५ स्टॉलपैकी ३५ स्टॉलधारकांनी नियमभंग केल्याचे आढळले. यामध्ये ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, कल्याण या स्थानकाचा समावेश आहे. या स्टॉलधारकांना ३१ प्रकारच्या कारणांसाठी दंड आकारण्यात आला आणि ८ लाख २0 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे ऊके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लांब पल्ल्याच्या पेण्ट्री कारमध्येही नियमांचे उल्लंघन२७ गाड्यांमधील पेण्ट्री कारची तपासणी केली असता आठ गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यांना १५ कारणांसाठी ९ लाख ५0 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.या कारणांसाठी कारवाई- आरोग्यास हानिकारण खाद्यपदार्थ- जादा दरात खाद्यपदार्थांची विक्री- परवानगी नसलेल्या खाद्यपदार्थांची विक्री- स्थानकातील स्टॉलमध्ये परवानगी नसताना सिलिंडरचा वापर