शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनल खाली करा

By admin | Updated: September 18, 2014 23:14 IST

समस्या मार्गी लागल्याला एक महिनाभराचा काळ संपताच आता या औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनल खाली करण्याचे आदेश महामंडळाने दिल्यामुळे या कारखानदारांपुढे आता नवी समस्या निर्माण झाली आहे.

महाड : गेल्या दीड वर्षापासून अग्निशमन दलाच्या अभावी हैराण झालेल्या महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांची गंभीर समस्या मार्गी लागल्याला एक महिनाभराचा काळ संपताच आता या औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनल खाली करण्याचे आदेश महामंडळाने दिल्यामुळे या कारखानदारांपुढे आता नवी समस्या निर्माण झाली आहे. महामंडळाच्या या तडकाफडकी निर्णयामुळे कारखानदार व वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पुढे आता नवा पेचप्रसंग उभा राहिला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यालगत मध्यवर्ती ठिकाणी 21 हजार 2क्क् चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड महामंडळाने वाहनतळासाठी विकसित केला असून या वाहनतळावर दररोज पाचशेहून अधिक अवजड व रसायनाचे टँकर्स आदि मालवाहतुकीची वाहने पार्किग करण्यात येत असतात. मात्र वाहनतळ म्हणून राखीव असलेला आणि सध्या वापरात असलेला भूखंड इंडिया पॉवर पार्टनर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी उद्योगाला महामंडळाने परस्पर विकल्यामुळे हे वाहनतळ खाली करण्याचे आदेश महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत. महामंडळाच्या प्रादेशिक अधिका:यांकडून दिलेल्या सूचनेनुसार महामंडळाचे महाडचे कार्यकारी अभियंता यांनी महाड उत्पादक संघटनेला दि. 15 सप्टेंबर 2क्14 रोजीच्या दिलेल्या पर्यायानुसार ट्रक टर्मिनलसाठी महाड औद्योगिक वसाहतीत अन्य ठिकाणी सोईस्कर भूखंड सूचवावा असे म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता ट्रक टर्मिनलचा मोक्याच्या ठिकाणचा हा भूखंड एका खाजगी पॉवर उद्योगाला परस्पर विकला असल्याची माहिती उजेडात आली.
विशेष म्हणजे महाड उत्पादक संघटनेलाही हा निर्णय घेण्यापूर्वी महामंडळाच्या अधिका:यांनी विश्वासात घेणो गरजेचे होते. मात्र तसे न करताच महामंडळाच्या वरिष्ठ अधिका:यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कारखानदारांची मोठी गैरसोय होणार असून ही अवजड व ज्वालाग्राही रसायनांची वाहने पर्ा्िक ग कुठे करायची ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक भूखंड उपलब्ध असताना ट्रक टर्मिनल म्हणून वापरात असलेला हाच मोक्याचा भूखंड त्या उद्योजकाला विकण्याची आवश्यकता नव्हती. औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेपासून या महाड औद्योगिक परिसरात उपलब्ध असताना हाच भूखंड त्या उद्योजकाला विकण्याचा अट्टाहास वरिष्ठ अधिका:यांनी करण्यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ट्रक टर्मिनलसाठी सोईस्कर भूखंड सुचवण्याबाबतचे महामंडळाचे उत्पादक संघटनेला पत्रे देण्याऐवजी त्या पॉवर उद्योगालाच अन्य भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महामंडळाने करायला हवी होती, असे मत एका कारखानदाराने व्यक्त केले. (वार्ताहर)
 
ट्रक टर्मिनलचा भूखंड परस्पर खाजगी उद्योगाला विक्री करण्याचा महामंडळाचा निर्णय दुर्दैवी आहे. यामुळे कारखानदारांना आता नव्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. हे ट्रक टर्मिनल हटवण्यास कारखानदाराचा विरोध आहे. ट्रक टर्मिनल खाली केल्यास संपूर्ण रस्त्यावर वाहने उभी करावी लागतील. - सुरेश भोसले, अध्यक्ष,महाड उत्पादक संघटना
 
ट्रक टर्मिनलचा हा भूखंड एका पॉवर उद्योगाला विक्री करण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झाला असून वरिष्ठ प्रादेशिक अधिका:यांच्या सूचनेनुसार आपण उत्पादक संघटनेला याबाबत पत्रनुसार कळवले आहे. नवीन ट्रक टर्मिनलसाठी अन्य सोईचा भूखंड सुचवण्यास उत्पादक संघटनेला कळवले आहे. 
- एस. आर. पाटील, कार्यकारी अभियंता