शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील विरोधामुळे प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Updated: May 18, 2016 05:26 IST

दोन बायकांचा दादला असणाऱ्या युवकाने मेव्हणीसोबतच्या प्रेमसंबंधाना घरचे विरोध करतात म्हणून प्रेयसीसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

सोलापूर : आधीच दोन बायकांचा दादला असणाऱ्या युवकाने मेव्हणीसोबतच्या प्रेमसंबंधाना घरचे विरोध करतात म्हणून प्रेयसीसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. येथील नईजिंदगी परिसरात मंगळवारी पहाटे ५ वाजता ही घटना घडली. रमेश यलप्पा शिपरी व दुर्गाव्वा दयामन्ना लळूडे (वय २५, सध्या दोघेही राहणार नईजिंदगी, सोलापूर, मूळ हुबळी-कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत़ कर्नाटकातून आलेला रमेश हा झाडूचा व्यवसाय करीत होता. त्याचे काही वर्षापूर्वी मयत दुर्गव्वा हिची लहान बहीण रेणुका हिच्याशी विवाह झालेला आहे. रमेश आणि रेणुका या दोघांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले आहेत. त्यानंतर रमेशने घराशेजारी राहणाऱ्या राधा नावाच्या तरु णीशी दुसरा विवाह केला. राधाला रमेशपासून दोन मुले आहेत. मयत दुर्गव्वा ही हुबळी येथे वास्तव्यास होती. तिचा विवाह झालेला असून ती तीन मुलांची आई आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व दुर्गाव्वा या दोघांचे मागील तीन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते़ यलव्वा ही मुळची हुबळी शहरातील आनंद नगर भागात राहणारी आहे़ रमेश याच्यावर जिवापाड प्रेम असल्याने यलव्वा ही दर आठवड्याला दोन ते तीनदा खास रमेशला भेटायला येत होती़ रमेश व दुर्गव्वा यांचे प्रेमसंबंध हे रमेशच्या आधीच्या पत्नी रेणुका, राधा आणि दुर्गव्वाचा पती द्यामन्ना यांना माहीत होते. त्यांनी या प्रेमसंबंधांना विरोधदेखील केला होता. परंतु, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दुर्गव्वा व रमेश हे कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. यापूर्वी रमेश व दुर्गव्वा हे दोघे दोन वेळा घरातून पळूनदेखील गेले होते. परंतु, काही दिवसानंतर ते दोघेही स्वत: परत आले होते. (प्रतिनिधी)