शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराचा मृत्यू

By admin | Updated: October 31, 2014 00:52 IST

प्रेयसीच्या आत्महत्येच्या काही वेळेनंतरच प्रियकराचाही संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे यशोदरानगरात (आनंदनगर) उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे आज सकाळी परिसरात तणावही होता.

उलटसुलट चर्चा : यशोधरानगरात तणावनागपूर : प्रेयसीच्या आत्महत्येच्या काही वेळेनंतरच प्रियकराचाही संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे यशोदरानगरात (आनंदनगर) उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे आज सकाळी परिसरात तणावही होता.खुशबू नारायण हारोडे (वय २५) आणि मयूर त्र्यंबक मेश्राम (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. आनंदनगरातील निकुंज शाळेजवळ पाली यांच्या घरी खुशबू भाड्याने राहात होती. तिच्या घराच्या मागच्या बाजूला मयूरचे घर आहे. या दोघांचे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बुधवारी सायंकाळी ४ वाजता खुशबूने विष प्राशन केले. तिला मेयोत नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयूरला ही वार्ता कळली. त्यामुळे तो तिच्या घरी गेला. रात्री ७ च्या सुमारास मयूर जखमी अवस्थेत घराजवळ आढळला. त्याच्या पोटावर धारदार शस्त्राचे घाव होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचाराकरिता मेयोत नेले. उपचार सुरू असताना पहाटे २ च्या सुमारास मयूरचा मृत्यू झाला. प्रेमी युगुलाचा असा करुण अंत झाल्यामुळे आज सकाळपासूनच आनंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच यशोदरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांच्याही कुटुंबीयांचे बयान नोंदवले. त्यानंतर प्रेयसीच्या विरहात मयूरने स्वत:ला जखमी करून आत्महत्या केल्याचा अंदाज बांधून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)दोघांची चौकशी मयूरची घराजवळच मोबाईल शॉपी होती. मयूरचा खून करण्यात आल्याची चर्चा सकाळपासून परिसरात ऐकू येत होती. त्यामुळे पोलिसांनी दोन संशयितांना ठाण्यात आणून त्यांची दिवसभर चौकशीही केली. मात्र, त्यांनी मयूरला मारल्याचा इन्कार केला. खुनाचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळाले नाही. त्याला दुसरे कुणी जखमी केले नाही, तर त्यानेच स्वत:ला भोसकल्याचे काहींनी सांगितल्यामुळे पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.