शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडक्या बहिणीं’ना हवे स्वाभिमानाचे भरलेले ताट

By संदीप प्रधान | Updated: October 14, 2024 12:06 IST

गोरगरीब लाडक्या बहिणींना महागाई व बेरोजगारी या दोन समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. सध्या अनेक जणींकडे अर्धवेळ रोजगार आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचे भागत नाही.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस स्वाभिमानी आहे. कुणाच्याही दारात फुकट भाकरीचे तुकडे मोडायला त्याला आवडत नाही. याचाच प्रत्यय मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमात आला. सभेला आलेल्या बहुतांश बहिणींशी संवाद साधला असता सरकार आम्हाला दरमहा दीड हजार रुपये देतेय त्याचा आनंद आहे; पण आम्हाला पूर्णवेळ रोजगार द्या, अशी मागणी बहिणींनी केली.  लाडक्या बहिणींना स्वाभिमानाने जगायचे असेल तर त्यांच्या तशा जगण्याचा बंदोबस्त सरकारने करायला हवा.

गोरगरीब लाडक्या बहिणींना महागाई व बेरोजगारी या दोन समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. सध्या अनेक जणींकडे अर्धवेळ रोजगार आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचे भागत नाही. भाजीपाला व रोजच्या जेवणातील डाळी, कडधान्ये यांचे दर चढे आहेत. कधी कांदा तर कधी लसूण भडकतो. सरकार देत असलेल्या पैशांमुळे अनेकींना आधार मिळालाय; परंतु हा कायमस्वरूपी मार्ग नाही, याची जाणीव त्यांना आहे. सरकारने दिलेल्या पैशांतून अनेकींनी मुलांची फी भरली. रेशनवरील धान्य भरले. क्वचित एखाद्या बहिणीने साडी खरेदी केली. दिवाळीत पोराबाळांना कपडे करावेत याकरिता बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्याच अधिक आहेत. महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटलंय की, घरातील बाई शिकली तर घराचा उद्धार होतो. जर या महिलांना रोजगार मिळाला तर अनेक घरातील मुलांचे शिक्षण मार्गी लागेल. मुले चांगली शिकली व भविष्यात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केले तर कुटुंबाची आर्थिक हलाखी संपुष्टात येईल.

महाराष्ट्रातील शहरी बेरोजगारीचा दर २०१८-१९ मध्ये ६.३ टक्के होता. तो २०२०-२१ मध्ये ६.५ टक्के झाला. गेल्या दोन वर्षांत राज्यात दररोज सरासरी दोनजण बेरोजगारीमुळे आत्महत्या करीत आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रात ६२५ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. २०२१ मध्ये देशात बेरोजगारीमुळे ३५४१ जणांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ७९६ महाराष्ट्रातील होते. २०२२ मध्ये देशात बेरोजगारीमुळे ३१७० लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ६४२ महाराष्ट्रातील होते. तरुणांच्या बेरोजगारीचा दर २०२०-२१ मध्ये १२.९ टक्के होता. २०२१-२२ मध्ये तो १२.४ टक्के होता. २०२२-२३ मध्ये तो १० टक्के होता.

२०१८ ते २०२४ मधील तरुणांच्या बेरोजगारीचा सरासरी दर ८.१७ टक्के होता. देशातील एकूण बेरोजगारांपैकी ८३ टक्के तरुण आहेत, असे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटच्या अहवालात नमूद केले आहे. देशातील श्रमशक्तीत महिलांचा सहभाग २००० ते २०१९ या काळात १४.४ टक्क्यांनी कमी झाला. २०२२ मध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ३२.८ टक्के होते तर पुरुषांचे प्रमाण ७९.२ टक्के होते. आम्हाला पूर्णवेळ काम द्या ही कैफियत लाडक्या बहिणींनी मांडण्याचे हेच कारण आहे. कोरोना काळात लोकांच्या रोजगारावर जी गदा आली त्यातून अजूनही लक्षावधी कुटुंबे सावरलेली नाहीत. पाच किलो धान्य व पंधराशे रुपयांचे आकर्षण आहेच; परंतु सोशल मीडियामुळे सुखी जीवनाच्या आशा-आकांक्षा वाढलेल्यांना मदतीची खिरापत नव्हे तर सुग्रास भोजनाचे ताट हवे आहे.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाNarendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिला