शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कळसुबाईच्या दर्शनाला लोटला भक्तांचा महापूर

By admin | Updated: October 8, 2016 12:33 IST

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या शिखरावर आज नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवसाचे औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. ८ -  नाशिक, नगर व ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या शिखरावर आज नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवसाचे औचित्य साधून भाविकांनी कळसुबाई मातेच्या दर्शनासाठी विक्रमी गर्दी केली. भाविकाच्या गर्दीमुळे शिखरावर जाणारा लोखंडी शिड्यांचा मार्ग काही काळ ठप्प झाला.  भाविकांची शिखरावर जाण्याची रीघ सुरूच आहे. यामुळे संपूर्ण शिखराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
समुद्रसपाटीपासून १६४० मीटर उंचीवर असलेल्या कळसुबाई शिखरावर कळसुबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिक, नगर व महाराष्ट्रातील इतर भागातून आलेल्या भाविकांची रीघ लागली होती. राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी  दाखल झाले आहेत. नगर जिल्ह्यातील बारी गाव व इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावापासून या शिखरावर जाण्यासाठी पायवाट असल्याने हे दोन्ही रस्ते भक्ताच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
 दरम्यान आज या शिखरावर भक्तांनी गर्दी केल्याने शिखरावर जाण्यासाठी असणा-या लोखंडी शिडया पूर्णपणे भाविकांनी भरल्याने शिखरावर जाणारा व येणारा मार्ग काही काळ ठप्प झाला.
 
प्रशासनाचे दुर्लक्ष 
राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर दरवर्षी नवरात्रीत लाखोच्या संख्येने भाविक येत असतात.परंतु भाविकांना आवश्यक असणा-या कोणत्याही सुविधा अकोले प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.