शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरीची लालसा पडली महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:25 IST

रेल्वे कर्मचा-याची २0 लाखाने फसवणूक

मलकापूर (जि. बुलडाणा) : अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याबाबत आलेल्या ह्यएसएमएसह्णला प्रतिसाद देणे एका रेल्वे कर्मचार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. शासकीय सेवेत असलेल्या शिवाजी रामभाऊ राऊत यांची लॉटरी प्रकरणात २0 लाख रुपयाने फसवणूक झाली असून, यासंदर्भात त्यांनी केलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी बुधवारी १७ खातेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर येथील शिवाजी रामभाऊ राऊत हे बोदवड येथे रेल्वे विभागात कार्यरत आहेत. १२ डिसेंबर २0१५ रोजी त्यांना अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनीवर मिळाला. भ्रमणध्वनीवरील संदेशानुसार राऊत यांनी शेगाव येथील 'एसबीआय'शाखेमधून सूचविण्यात आलेल्या संबंधित बँक खात्यात २६ डिसेंबर २0१५ ला २५ हजार रुपयांची रक्कम जमा केली; मात्र कोणतेही पार्सल त्याला मिळाले नाही. उलट वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये आणखी रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबतसुद्धा काहीही शहानिशा न करता अडीच कोटीच्या लालसेपोटी त्यांनी विविध खात्यांमध्ये १२ लाख रुपये जमा केले. यानंतर लॉटरीचे पैसे केव्हा मिळणार? याची विचारणा संबंधितांना केली असता, तुमच्या नावाने आरबीआयमध्ये खाते उघडण्यात आले असून, रक्कम दिल्लीला मिळणार असल्याचे तथाकथीत कंपनीमधील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार राऊत ११ फेब्रुवारी २0१६ ला दिल्लीला पोहोचले व सुचविण्यात आलेल्या पत्त्यावर कंपनीच्या अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी मात्र त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या कंपनीच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतरही अडीच कोटी रुपयाच्या लालसेपोटी त्यांनी पुन्हा सूचविण्यात आलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर सात लाख रुपये जमा केले. अशाप्रकारे १९ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केल्यानंतरही लॉटरीची कोणतीही रक्कम मिळत नसल्याने अखेर शिवाजी राऊतने पोलीस स्टेशनला धाव घेतली.  दोन एकर शेतीही विकलीतथाकथीत कंपनीच्या अधिकार्‍यांकडून वारंवार होणारी पैशाची मागणी पूर्ण केल्यानंतर १२ लाखाची रक्कम जमा केल्यानंतरही आणखी सात लाखांची मागणी करण्यात आली. पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने राऊत यांनी अखेर नऊ लाख रुपयांत दोन एकर शेती विकली व या रकमेतील सात लाख रुपये पुन्हा विविध खात्यांमध्ये जमा केले आहेत.तोतया सीबीआय अधिकारीच मुख्य सूत्रधार !अडीच कोटी रुपये मिळविण्यासाठी १५-२0 लाख रुपये खर्च करण्याची तयारी शिवाजी राऊतने दाखविली. त्यामुळे राऊतचा पूर्ण विश्‍वास बसावा, यासाठी एकाने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून त्यांना बनावट ओळखपत्रदेखील पाठविले. बर्‍याच कालावधीनंतर लॉटरीचे पैसे मिळत नसल्यामुळे राऊतने या सीबीआय अधिकार्‍याची माहिती काढली असता, ओळखपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तोतया सीबीआय अधिकारीच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.