शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्र्यांच्या घोषणेला एसटीचा खो

By admin | Updated: July 19, 2016 21:19 IST

विद्यार्थ्यांना दरवर्षी एसटीची सवलत पास दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर्षी अशा पासेस शाळेतूनच वितरित करण्याची घोषणा परिवहन

- अविनाश साबापुरे

यवतमाळ, दि.19 - विद्यार्थ्यांना दरवर्षी एसटीची सवलत पास दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर्षी अशा पासेस शाळेतूनच वितरित करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. परंतु एसटी महामंडळाने या घोषणेची वासलात लावली असून, पासेसकरिता विद्यार्थ्यांन भर पावसात बसस्थानकावरच रांगा लावाव्या लागत आहे. राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी राज्यातील साधारण १६ लाख विद्यार्थ्यांना मासिक शैक्षणिक सवलती पास वितरित केली जाते. खेडापाड्यातून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ६० टक्के सवलतीच्या पासमुळे मोठा आर्थिक हातभार लागतो. परंतु या पासेस मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थी एकाच वेळी धाव घेत असल्यामुळे एसटी आगारात गर्दी होऊन विद्यार्थ्यांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागते. ही बाब लक्षत घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित शाळेमधूनच विद्यार्थ्यांना प्रवासी सवलतीच्या पासेस देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू होताच सुरूवातीच्या १० दिवसात एसटी महामंडळाचे कर्मचारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पासेस वाटप करणार अशी घोषणा होती. परंतु शैक्षणिक सत्र सुरू होऊन पंधरवडा लोटल्यावरही हा उपक्रम बासनातच गुंडाळून आहे. राज्य परिवहन महामंडळातील सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शिवाय सध्या एसटीच्या हंगामाचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पासेससाठी शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचारी पाठविणे शक्य नाही, असे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. काही अधिकारी आपण आगार प्रमुखांना सूचना दिल्याचे सांगून मोकळे होत आहे, तर कर्मचारी मात्र हा उपक्रम राबविणे शक्यच नसल्याचे खासगीत स्पष्ट करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून दररोज यवतमाळात शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सध्या सवलतीच्या पासेससाठी बस स्थानकात रांगा लावाव्या लागत आहे. यवतमाळातील विविध शाळांमध्ये पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांना दर दिवशी बसस्थानकावरून पासेस वाटप केल्या जात आहे. त्यासाठी त्यांना शाळेतून बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन बसस्थानकावर दिवसभर रांगेत राहावे लागत आहे. खुद्द परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री यांनी घोषित केलेल्या योजनेला महामंडळाच्याच कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचे दिसत आहे. सर्व आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहे. मात्र हा उपक्रम कोणत्या आगाराने सुरू केला किंवा कोणत्या आगाराने नाही केला, याविषयी माहिती घेऊन कळविण्यात येईल. मात्र सध्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहेच. -मुक्तेश्वर जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी, यवतमाळ