शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेमुळेच ‘वसंतदादा’चे नुकसान

By admin | Updated: November 27, 2014 23:52 IST

विशाल पाटील : कारखान्याच्या प्रकल्पाला बँकेचा फटका

सांगली : जिल्हा बँकेचा सीआरएआर (कॅपिटल टू रिस्क वेटेड अ‍ॅसेटस् रेश्यू) दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळेच ‘हुडको’कडून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कर्ज मिळू शकले नाही. याशिवाय बॅँकेने चांगला सीआएआर असलेल्या बॅँकेची गॅरंटी मिळवून न दिल्यानेच हा कर्जप्रकल्प रद्द झाला, अशी माहिती वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आज (गुरुवारी) दिली. ते म्हणाले की, ज्यावेळी या वीजनिर्मिती प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव हुडकोला सादर झाला, त्यावेळी त्यांनी सक्षम बॅँकेकडून बॅँक गॅरंटी मागितली होती. आमचे खाते जिल्हा बॅँकेत असल्यामुळे त्यांच्याकडेच याबाबतची मागणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. जिल्हा बॅँकेने स्वत:ची कौंटर गॅरंटी दिली. त्यांचा सीआरएआर कमी असल्याने हुडकोने आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हा बॅँकेने राज्य बॅँकेची गॅरंटी दिली. वास्तविक राज्य बॅँकेचा सीआरएआरही नियमापेक्षा कमी होता. तरीही राज्य बॅँकेने हे प्रमाण दोन वर्षात १० टक्क्यांपर्यंत जाईल, असे सांगितले. त्यामुळे हुडकोने संबंधित गोष्टींसाठी थोडी मुदत दिली. राज्य बॅँकेच्या सीआरएआरचे प्रमाण तसेच राहिल्याने अखेर हुडकोने हा प्रकल्प रद्द केला. जिल्हा बॅँकेने ठरविले असते तर, त्यांनी सक्षम बॅँकेची गॅरंटी कारखान्याला मिळवून दिली असती. तरीही त्यांनी राज्य बँकेचीच गॅरंटी दिली. ज्या कामापोटी बॅँक गॅरंटी शुल्क दिले होते, ते कामच रद्द झाल्याने गॅरंटी शुल्क परत घेणे, हा आमचा अधिकार आहे. राज्य बॅँकेने लगेचच याबाबतची अंमलबजावणी केली. वास्तविक कारखान्यामुळे बँकेचे नव्हे, तर बॅँकेमुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. वीजप्रकल्प पूर्ण झाला असता, तर आता कारखान्यासमोरील अनेक अडचणी दूर झाल्या असत्या, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)