शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळप्रकरणी लहाने दोषी

By admin | Updated: January 14, 2017 05:33 IST

मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर न्यायालयाची परवानगी न घेताच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची परवानगी दिल्याबद्दल विशेष न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी कोठडीत असलेल्या भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याबाबत आपली काहीच भूमिका नाही, असे गेल्या महिन्यात डॉ. लहाने यांनी विशेष न्यायालयाला सांगितले होते. तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात दाखल केले होते. भुजबळांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले गेले, त्यावेळी काही चाचण्यांबाबत दुसरे मत घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाने त्यांची रवानगी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केली. मात्र, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती. डॉ. लहाने यांच्या शिफारशीवरूनच भुजबळ यांच्यावर व्हीआयपी ट्रिटमेन्ट झाली, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केला होता. तशी तक्रारही त्यांनी दाखल केली होती. भुजबळ बॉम्बे हॉस्पिटमध्ये उपचार घेत असताना अनेक राजकीय नेते त्यांना भेटल्याची बाबही दमानिया यांनी तक्रार अर्जात नमूद केली होती. न्यायालयापुढे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता जे. जे. रुग्णालय आग्रही होते असे दिसून येते. न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला भुजबळांच्या तीन वेगवगेळ्या चाचण्या करण्याचा आदेश दिला होता. पण भुजबळांना असलेल्या अन्य आजारांवर उपचार करण्याचा अधिकार दिला नव्हता. भुजबळ यांना मनी लाँड्रींगप्रकरणी १४ मार्च रोजी ईडीने अटक केली. त्यानंतर तब्येतीचे कारण देत भुजबळ दोन महिने उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत राहिले. (प्रतिनिधी)