शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूटमार

By admin | Updated: July 12, 2017 04:52 IST

पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चौघांपैकी सागर तेलम (२०, रा. देऊळवाडी, कसारा) याला नागरिकांनी चोप देऊन इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली

लोकमत न्यूज नेटवककल्याण : पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चौघांपैकी सागर तेलम (२०, रा. देऊळवाडी, कसारा) याला नागरिकांनी चोप देऊन इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कल्याण रेल्वे न्यायालयाने सागरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबईत राहणारे उदय यादव (३२) हे बिहार येथे गावी जाण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री १२.१५च्या सुमारास पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये बसले. मुंबईहून सुटलेली ही गाडी सव्वा एकला कल्याणला पोहोचली. तेथे अनेक प्रवासी चढले. त्यानंतर गाडी कसाऱ्याच्या दिशेने निघाली. कल्याण स्थानक सोडून १५ मिनिटे होताच गाडीत चढलेल्या चौघांनी प्रवाशांना विनाकारण मारहाण करत पैसे लुटण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने यादव यांनाही मारहाण करत त्यांच्या खिशातील साडे सात हजारांची रोकड काढून घेतली. ते पाहून काही नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर काही प्रवासी हिंमत करू न त्यांच्या अंगावर धावून गेले. सागर प्रवाशांच्या कचाट्यात सापडला. अन्य तिघे स्थानक येताच पळून गेले. पोलिसांनी तपासाअंती तिघांनाही अटक केली असून ते अट्टल गुन्हेगार आहेत.