शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

खाणकामगारांच्या भटक्या मुलांना शिक्षणाचे ‘वळण’

By admin | Updated: December 6, 2015 02:30 IST

भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..?

- प्रवीण गायकवाड,  शिरूर (पुणे)भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..? या विचाराने ६५ वर्षांचा ‘तरुण’ नव्या उभारीने जागा झाला आणि प्रयत्नांची मोट बांधली. त्यांच्या प्रयत्नांतूनच कर्डेलवाडीच्या शाळेमध्ये आता खाणकामगारांची २३ मुले नियमित शिक्षण घेऊ लागली आहेत. सुभाष कुसाळकर हे ६५ वर्षांचे खाणकामगार गेल्या १२ वर्षांपासून कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे रघुनाथ कर्डिले यांच्या दगडखाणीवर काम करतात. कुसाळकरांच्या पाहण्यात कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळा आली. आपण शिकलो नाही; मात्र आपली नातवंडे, समाजाची इतर मुले शिकली तर पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असे कुसाळकर यांना जाणवले.खाणमालक कर्डिले यांनीही कुसाळकरांच्या इच्छेला वाट करून दिली. यामुळे कुसाळकर यांनी नाशिक व बुलढाणा येथे असलेल्या आपल्या कुटुंबाला कर्डेलवाडी येथे बोलावून घेतले. भटकंतीचा नाद सोडून मुलांसाठी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतर खाणकामगारांनीही हाच मार्ग अवलंबला. आता या २३ मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. तीन महिन्यांतच त्यांच्यात झालेला बदल वाखाणण्याजोगा आहे. शिक्षणामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.अन् मुलं लिहू-वाचू लागली!शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका बेबीनंदा सकट या दाम्पत्याने मोठ्या आनंदाने या मुलांना शाळेत प्रवेश दिला. तीन मुले दुसरीत आहेत, तर इतर पहिल्या इयत्तेत शिक्षण घेताहेत.तीन महिन्यांतच या मुलांना लिहिता-वाचता येऊ लागले असून, त्यांचे अक्षरही वळणदार होऊ लागले आहे. एक दिवसही ते शाळेला दांडी मारत नाहीत.