गणोश वासनिक- अमरावती
राष्ट्रीय पक्षी म्हणून नोंद असलेल्या मोरांची संख्या रोडावत असल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने मोराचे पीस अथवा साहित्य विक्रीची कायदेशीर बाजू तपासण्याचे अधिकार वनविभागाला दिले आहेत. नैसर्गिक गळती झालेल्या मोरपिसांची विक्री करता येईल, अन्यथा वन अधिनियमानुसार संबंधिताला कारागृहाची हवा खावी लागेल, असे आदेश बजावण्यात आले आहेत.
काही वर्षापासून मोरपिसे आणि साहित्य विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ही मोरपिसे ख:या अर्थाने नैसर्गिक गळतीची आहेत किंवा नाही, याची चाचपणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने आदेश काढले असून, मोर पिसांचा व्यापार व व्यवहार करण्यावर बंदी नसली तरी मोरपिसांचे स्थानांतरण, वाहतूक परवाना आवश्यक आहे. त्यामुळे राजरोसपणो विक्री होणारे मोरपीस आणि त्याचे साहित्य कोठून, कसे, कोणी आणले हे तपासण्याचे अधिकार वनअधिका:यांना बहाल करण्यात आले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी मोर पिसांची विक्री करणा:या व्यापा:यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता खुलेआम मोरपिसांची विक्री करताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीकडे वाहतूक परवाना आवश्यक राहील, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा नवा शासन आदेश देण्यात आला आहे. ज्या भागातून हे मोरपीस आणले गेले त्या भागातील वनअधिका:याचे हे मोरपीस नैसर्गिक गळतीचे असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल, असा शासन आदेश आहे.
मोरपिसांच्या नैसर्गिक गळतीवरही प्रश्नचिन्ह
मोरांची संख्या अधिक असली तरी विणीच्या काळात अंगावर असलेल्या पिसांपैकी नृत्य करीत असताना केवळ 2 ते 3 टक्केच पिसे अंगावरुन गळतात. मोरांच्या अंगावरुन पिसे पडण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आहे, असे वन्यजीव प्रेमींचे म्हणणो आहे. मात्र बाजारात मोरपीस आणि साहित्य विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोर पिसांच्या नैसर्गिक गळतीवरही संशय व्यक्त केला जात आहे.
मोरांचे वास्तव्य वाढीस लागावे, यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. वडाळी वनपरिक्षेत्रत मोरांची संख्या ब:यापैकी आहे. मोरांच्या संरक्षणासाठी वनकर्मचारी सतत दक्ष आहेत. शासन आदेशाची काटेकोरपणो अंमलबजावणी करण्यासाठी मोरपीस, साहित्य विक्रीचे केंद्र तपासले जातील. चौकशीअंती कारवाई करण्यात येईल़
- पी.के. लाकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी
विदर्भात या वनात आढळतात मोर
अमरावती जिल्हय़ात मेळघाट, वडाळी, महेंद्री, वरुड, अकोट, पोहरा बंदी, मालखेड तर बुलडाणा जिल्हय़ातील ज्ञानगंगा अभयारण्यात नोंद आहे. वनविभागानुसार अकोला जिल्हय़ात काटेपूर्णा अभयारण्य, यवतमाळ जिल्हय़ात टिपेश्वर, पांढरकवडा वनविभाग, माहुरगड तसेच वर्धा जिल्हय़ात बोर अभयारण्य, तळेगाव, आष्टी, नागपूर पेंच, रामटेक गड, चंद्रपूर जिल्हय़ात नवेगाव बांध, नागङिारा, पवनी आणि गडचिरोली जिल्हय़ातही मोरांची संख्या अधिक आहे.