शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बॅगच्या ओझ्यावर करडी नजर

By admin | Updated: January 14, 2016 02:26 IST

स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी,

मुंबई : स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे केली. प्रत्यक्षात समितीने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात येते की नाही हे पाहायचे आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढण्यास नकार दिला.विद्यार्थ्यांच्या वयाच्या व वजनाच्या मानाने त्यांच्या खांद्यावर असलेल्या दप्तराचे ओझे अधिक असल्याने त्यांना अनेक विकार जडतात. त्यामुळे त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका चेंबूरच्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील अंजली हेळेकर यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही याचिका निकाली काढावी, अशी विनंती खंडपीठाला केली होती. (प्रतिनिधी) निर्णयानंतर दुर्लक्ष होतेकोणत्याही बाबतीत शासन निर्णय काढणे, ही सरकारची पहिली पायरी असते. त्यानंतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याची अंमलबजावणी केलीच जात नाही. दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी प्रत्येक शाळा करते की नाही, हे आम्हाला पाहायचे आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका निकाली काढणार नाही, असे म्हणत खंडपीठाने याचिका निकाली काढण्याची सरकारची विनंती फेटाळली.