शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या पुढाकाराने मिळणार मायेचे छत्र

By admin | Updated: November 30, 2014 01:25 IST

क्रूर पित्याच्या कृत्याने मातेच्या ममतेला पारखी झालेल्या पाचपैकी एका चिमुकलीस आता मायेचा आधार मिळणार आहे.

सोलापूर : क्रूर पित्याच्या कृत्याने मातेच्या ममतेला पारखी झालेल्या पाचपैकी एका चिमुकलीस आता मायेचा आधार मिळणार आहे.  महानंदा योगीनाथ चिडगुंपी यांनी  बोराळे येथील वाघमारे  कुटुंबातील सारिका बाजीराव वाघमारे या दोन वर्षाच्या तान्हुलीस दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.  कायदेशीर प्रक्रियेनंतरच सारिकाला ख:या अर्थाने मायेची उब मिळणार आहे. एक सामाजिक बांधिलकी जोपासत ‘लोकमत’ने यासाठी पुढाकार घेतला आहे. 
पाच मुली जन्माला आल्या. आता सहावीही मुलगीच होणार. वंशाला दिवा पाहिजे म्हणून  पत्नी राणी हिचा पती बाजीराव याने निर्घृण खून केला. दुस:या दिवशी ‘आजोबा सांगा ना हो, आई कधी येणार..’ हे वृत्त वाचून कुमार करजगी यांची कन्या महानंदा योगीनाथ चिडगुंपी या भावुक झाल्या. स्वत:ला मुलगी नसल्याची खंतही त्यांना होतीच. गेल्या अनेक महिन्यांपासून एका निराधार मुलीस दत्तक घेण्याची त्यांची इच्छा होती.  पाचपैकी अगदी छोटी असलेल्या सारिकाला दत्तक घेण्याची इच्छा त्यांनी आपले वडील कुमार करजगी यांच्यासमोर व्यक्त केली.
दरम्यान, ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांच्याशी त्यांनी संपर्क साधून आपली संकल्पना मांडली. ‘लोकमत’च्या माध्यमातून या संकल्पनेस अधिक गती मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर संपादक माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करीत सत्कारही केला. यावेळी कुमार करजगी यांच्या कन्या महानंदा योगीनाथ चिडगुंपी, भाग्यश्री रेणू पवार आणि वर्षा रविकिरण विभुते उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
 
महानंदांचे पाच वर्षापासूनचे होते स्वप्न
महानंदा चिडगुंपी यांना दोन मुलेच आहेत. आपणास मुलगी नसल्याची खंतही महानंदा यांना होतीच. कुठल्या तरी मुलीला दत्तक घेण्याची त्यांची पाच वर्षापासून इच्छा होती. त्यातच ‘लोकमत’मधील वृत्त वाचून त्यांनी छोटय़ा सारिकाला दत्तक घेण्याची संकल्पना आपले पिता कुमार करजगी यांच्यासमोर मांडली आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून ही संकल्पना तडीस जाईल, अशी अपेक्षा महानंदा चिडगुंपी यांनी व्यक्त केली.