शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सानपाड्यात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

By admin | Updated: January 20, 2017 02:51 IST

सानपाडा जंक्शनवर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

नवी मुंबई : सानपाडा जंक्शनवर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. येथील सिग्नल यंत्रणा गेली अनेक महिने बंद असल्याने सुसाट वाहनांवर कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. याचा परिणाम म्हणून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सानपाडा रेल्वे स्थानकाच्या समोर सायन-पनवेल महामार्गावर हे जंक्शन आहे. स्थानकावरून एपीएमसी मार्केटकडे जाण्यासाठी याच जंक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी नियमित होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मुंबईकडे किंवा पनवेलकडे जाणारी वाहने या पुलाचा वापर करतात. परंतु एपीएमसी मार्केट, तुर्भे किंवा सानपाड्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुलाखालील जंक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे पुलाखाली चारही बाजूने वाहनांची वर्दळ असते. येथील वाहतुकीचे नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रात्रीच्या वेळी एपीएमसीकडून येणाऱ्या वाहनांना महामार्गावरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी एपीएमसीतून येणारी अवजड वाहने वाशी सेक्टर ३0 येथील वाहनतळावर पार्किंगसाठी जात असल्याने या जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. जंक्शनच्या अगदी लगत मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर नेहमीच खासगी प्रवासी वाहनांचा डेरा असतो. त्यामुळे या परिसरात नेहमीच अनागोंदीचे वातावरण दिसून येते. यातच सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक अगदी बेशिस्तीने येथून मार्ग काढतात. या सर्वांचा परिणाम म्हणून हे जंक्शन धोकादायक बनले असून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)>वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिकाअनेकदा या पुलाखाली वाहतूक पोलीस तैनात असतात. परंतु वाहतुकीला शिस्त लावण्याचा कोणताही प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाही. येथे उभे राहून ते केवळ बघ्याची भूमिका घेतात. यासंदर्भातसुध्दा कार्यवाही होण्याची गरज असल्याचे वाहनधारकांचे मत आहे.