शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये विनयभंग करणाऱ्यास अटक

By admin | Updated: August 11, 2015 01:54 IST

लोकलमध्ये युवतीचा विनयभंग करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी सोमवारी अटक केली. पप्पू यादव (१९) असे त्याचे नाव आहे. त्याची अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती जीआरपीकडून देण्यात आली.

पणजी : दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना चालू वर्षाच्या आतच मार्गी लागेल, असे आश्वासन आरोग्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सोमवारी विधानसभेत दिले. आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. या योजनेवर चर्चा विनिमयासाठी ४० ते ५० बैठका आजवर झालेल्या आहेत. योजना आदर्श अशीच बनविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तोपर्यंत गरजवंतांना मेडिक्लेमचा लाभ आम्ही देत आहोत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. म्हापसा व फोंडा येथील सरकारी इस्पितळांमध्ये डायलिसीस युनिट सुरू केले जाईल. परिचारिका, लॅब टेक्निशियन्स, सर्व्हंट आदी मिळून २६१ पदे महिनाभरात भरली जातील. बांबोळी येथे मुलीच्या वसतिगृहाचे तसेच लेक्चर हॉलचे उद्घाटन येत्या १५ आॅगस्ट रोजी केले जाईल. अशा महत्त्वाच्या घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केल्या. आॅडिटोरियमचे काम आॅक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. गोमेकॉत एमबीबीएसच्या १५० जागा कायम राहतील. एमसीआयने या जागांना कधीही नकार दिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोमेकॉत ४५ परिचारिकांची भरती केली जाईल. ५५७ पैकी १५० परिचारिका बाल संगोपनाच्या दीर्घ रजेवर असल्याचे ते म्हणाले. गोमेकॉत गरजूंना मोफत औषधांची सोय आहे. २४ कोटी ९८ लाख रुपये त्यासाठी मंजूरही झालेले असून निविदा काढून औषधे आलेली आहेत. रुग्णांना बाहेरून ती खरेदी करण्याची सक्ती केली जात असेल तर त्याची चौकशी होईल, अशी हमी डिसोझा यांनी दिली. तत्पूर्वी आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवर कपात सूचना मांडताना विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी १०८ रुग्णवाहिका सेवेच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले. दांडो, सांगे येथे दुचाकी अपघातात एका महिलेने आपल्या डोळ्यादेखत प्राण सोडले. रुग्णवाहिका वेळेत आलीच नाही. नेत्रावळी येथे रुग्णवाहिका होती. इस्पितळ सांगेत असताना रुग्णवाहिका इतक्या लांब का, असा सवाल त्यांनी केला. या महिलेला आपण वाचवू शकलो नाही याबद्दल आपल्याला अपराधी वाटते, असे ते म्हणाले. आमदार विश्वजित राणे यांनी अर्ध्याहून अधिक १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)