शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत लाभधारकांना कर्जवाटप

By admin | Updated: September 22, 2016 03:08 IST

रायगड जिल्ह्यातील १३ हजार ७७९ लाभार्थींना विविध बँकांच्या माध्यमातून एकूण १२९ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले

अलिबाग : लहान व मध्यम स्वरूपाचे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच सुरू असलेल्या व्यवसायाच्या वृध्दीकरिता देशपातळीवर अमलात आणलेल्या ‘पंतप्रधान मुद्रा कार्ड योजने’अंतर्गत रायगड जिल्ह्यातील १३ हजार ७७९ लाभार्थींना विविध बँकांच्या माध्यमातून एकूण १२९ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी जिल्हा बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत देण्यात आली. या कर्ज वितरणामुळे जिल्ह्यातील लहान व मध्यम व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष वृद्धीचे परिणाम साध्य झाले असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहे. विविध बँकांमधील व्यावसायिक स्पर्धेमुळे बँकांकडून मोठ्या व्यावसायिकांना किंवा प्रस्थापित उद्योजकांना बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी फारशी अडचण येत नाही. मात्र लहान व मध्यम व्यवसाय करणारे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि कर्ज मिळविणे काहीसे अडचणीचे होते. लहान व्यावसायिकांची ही अडचण दूर करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना देशात ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करुन सुरू करण्यात आली.पंतप्रधान मुद्रा योजनेत लहान व्यावसायिकांना शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरु ण कर्ज योजना अशा तीन प्रकारात कर्ज देण्यात येते. शिशू कर्ज या अंतर्गत ५० हजार रु पयांपर्यंत, किशोरांसाठी ५० हजार ते ५ लाखांपर्यंत आणि तरु ण कर्ज योजनेत ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. या तीन कर्जांवर आकर्षक व्याज दर आकारण्यात येतो. कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. या योजनेत दिलेले हे मुद्राकार्ड मुख्यत: कृषी क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतु नुकतेच कृषी क्षेत्राला पूरक असणाऱ्या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळणार आहे. छोटे व्यवसाय क्षेत्रात भाजीपाला विक्र ी, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीन, खानावळ, ब्युटी पार्लर, खाद्यपदार्थ विक्री, पोल्ट्री फार्म, सेवा उद्योग अशा प्रकारचा कुठलाही लघुउद्योग सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करु न देण्यात आले आहे. >मूळ संकल्पना मुद्रा कार्ड हे बँकेच्या डेबिट वा क्रे डिट कार्डसारखे काम करते. लाभधारकाला मंजूर करण्यात आलेली कर्ज रक्कम त्याच्या आवश्यकतेनुसार मुद्रा कार्डच्या सहाय्याने बँकेच्या एटीएममधून काढता येते. मुद्रा योजनेत सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी बँका, पतसंस्था कर्ज वितरणाकरिता सहभागी आहेत. सूक्ष्म पतपुरवठा (मायक्रो फायनान्स) ही योजनेची मूळ संकल्पना आहे. मायक्रो फायनान्समुळे लघुउद्योगांना चालना मिळून छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते. योजनेमुळे देशाच्या प्रगतीमध्ये लघुउद्योजकांचे योगदान लाभत आहे.