शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

सा.बां.चे दुर्लक्ष रहिवाशांच्या जीवावर

By admin | Updated: July 12, 2017 03:36 IST

झाडे कोसळण्याच्या घटना घडत असताना बारा बंगल्यातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारात असलेल्या एका घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ््यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत असताना बारा बंगल्यातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारात असलेल्या एका घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी टळली. सार्वजनिक बांधकाम विभागाला या झाडाबाबतची तक्रार करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली, यात जीवितहानी देखील होण्याची शक्यता होती, असा संताप तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी व्यक्त केला. मात्र, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठामपा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.ठाणे पूर्व येथील बारा बंगला परिसरातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारातील शासकीय सदनिकांमध्ये अनेक वर्षापासून काही कुटुंब राहत आहेत. ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे घरकामाला असणाऱ्या पुष्पा महामुनी यांच्या घरावर दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळले. या घटनेत त्यांच्या घराचे छप्पर तुटले असून घरासमोर असलेली सर्व भांडीदेखील तुटली आहेत. तसेच, घराच्या अंतर्गत भागाचेदेखील नुकसान झाले आहे. हे झाड मोडकळीस आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला काही दिवसांपूर्वी कळविण्यात आले होते. परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप या सदनिकेत राहणाऱ्या कुटुंबियांनी केला. बारा बंगल्यातील २५ झाडे ही धोकादायक असल्याचे ठाणे महापालिकेला कळविण्यात आले होते. परंतु, याबाबत पालिकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. आम्हाला सर्व झाडे पाहणे शक्य होत नाही. तसेच, रहिवाशांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची सारवासारव तेथील संबंधित कर्मचाऱ्याने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इंद्रायणी बंगल्यातील झाडांबाबतच्या कोणत्याही तक्रारी ठाणे महापालिकेकडे आले नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले. प्रत्येक बंगल्यातील शासकीय सदनिकांच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची काळजी घेणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे.परंतु, या विभागाकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची नाराजी येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तसेच, या सदनिकांच्या आवारातील कोणतेही झाड कधीही कोसळू शकते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, झाड कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.