शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या कारखान्यातून ९० लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: August 12, 2014 02:49 IST

बंद कारखान्याचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी भायखळा येथे घडली.

मुंबई : बंद कारखान्याचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी भायखळा येथे घडली. याबाबत काळाचौकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भायखळ्याच्या हरिहंत टॉवरमध्ये राहणारे अरविंद नाईक यांचा याच परिसरातसोन्याचे दागिने तयार करण्याचा कारखाना आहे. शनिवारी रात्री या कारखान्यातील कामगार काम संपवून घरी गेले. त्यानंतर नाईकदेखील कारखाना बंद करून घरी परतले. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारखान्यात आले. काही दागिने व्यापाऱ्यांकडे डिलेव्हरी करायचे असल्याने त्यांनी कपाट उघडले. मात्र कपाटातील सर्व दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब तत्काळ काळाचौकी पोलिसांना सांगितली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून कारखान्यातील आणि कारखान्याबाहेर असलेले सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. चोरट्यांनी कुठल्याही प्रकारची तोडफोड न करताच दागिने लंपास केले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी बनावट चावीचा वापर केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. ही चोरी ओळखीच्याच व्यक्तींनी केल्याचा संशयही व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)