शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 06:00 IST

मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा लक्षणीयरित्या वापर भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर सर्वच भाषांच्या विकासासाठी

मराठी लोकांनी शुध्द भाषा किंवा प्रमाण भाषा अशा वादात न अडकता भाषेचा सन्मान करायला हवा. प्रमाण भाषा पुस्तकांमध्ये वापरली जावी, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, बोलीभाषेत प्रमाण भाषेचा आग्रह धरणे अतिशयोक्तीचे आहे : अनिल गोरे  

..............................................

- प्रज्ञा केळकर-सिंग राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे उर्फ मराठी काका यांना जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी साधलेला संवाद.   

.....................

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे?  -  महाराष्ट्राइतका भाषेबाबतचा भेदभाव जगात इतरत्र कोठेच पहायला मिळत नाही. स्थानिक भाषेबाबतच दुजाभाव उपयोगाचा नाही. भेदभाव दूर केल्यास भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित होईल. सध्याच्या काळात भाषिक समानता अत्यंत गरजेची आहे. किंबहुना भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत, केवळ घोषणा होणे बाकी आहे. अभिजातचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी राखून ठेवलेला असू शकतो. आपली सत्ता धोक्यात आली आहे, असे वाटेपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही, असे माझे मत आहे. भाषा हे राजकारणाचे मोठे हत्यार असते आणि राजकीय लोक स्वत:च्या सोयीनुसार योग्य वेळी हे हत्यार वापरत असावेत. 

मराठी भाषिकांमध्येच भाषेची उदासिनता कशामुळे ?मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत. सामान्य माणसाचे ७० टक्के  आयुष्य शासनाशी संबंधित असते. मात्र, मराठीचा आग्रह धरला तर आपण मुर्ख ठरू, अशी भीती नागरिकांना वाटते. इतर राज्यांमध्ये दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये करण्याची सोय असल्याने टोकाची भाषिक अस्मिता पहायला मिळते. महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. बँक, न्यायालय, मोबाईल अशा अनेक ठिकाणी मराठीतून व्यवहार करणे सोपे झाले आहे. अस्मिता व्यक्त करण्याची साधने उपलब्ध झाली की लोकांचे भाषाप्रेमही आपोआप दिसू लागते. 

शाळांमध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे? बऱ्याच इंग्रजी शाळांमध्ये मुले एकमेकांशी मराठीत बोलतात. मात्र, इंग्रजी भाषेतच संवाद साधावा असा आग्रह शिक्षकांकडून केला जातो. मराठीत बोलणे कमीपणाचे मानले जाते. मात्र, ज्यांना मराठी नीट बोलता येत नाही, त्यांचे इंग्रजीही कच्चे राहते, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती झाल्यास मुलांना अर्थछटा, शब्दछटा समजू लागतील आणि त्यांचे भाषिक कौशल्य वाढीस लागेल. भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर त्याचा उपयोग सर्वच भाषांच्या विकासासाठी होतो. ...........व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढणार नाही, तोवर बदल घडणार नाहीत. त्यामुळे व्यापारामध्ये मराठीचा वापर व्हायला हवा. उदाहरणादाखल, मार्केटिंगसाठी आलेल्या कोणत्याही कॉलला मराठीतच उत्तर द्यायचे असे प्रत्येकाने ठरवल्यास कॉल सेंटरला मराठी भाषेचा वापर वाढवाला लागेल आणि मराठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीState Governmentराज्य सरकार