शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकलाही ‘गंगाआरती’

By admin | Updated: August 28, 2016 02:34 IST

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकला गंगाआरती सुरू करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकला गंगाआरती सुरू करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, वन व पाटबंधारे खाते यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. त्यात लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील पर्यटनस्थळ विकसित करण्याबाबत सूचना मांडल्या. आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी रामकुंडावर गंगाआरती सुरू करण्याची मागणी केली. त्यावर गंगाआरती सुरू करण्यासाठी तत्काळ २० लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे रावल यांनी सांगितले. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी सप्तशृंग गडावरील रोप-वे ट्रॉली सुरू करण्याबरोबरच हतगड येथे पर्यटनस्थळ विकसित करून तेथेही रोप-वे सुरू करण्याची मागणी केली. खा. हेमंत गोडसे यांनी अंजनेरी, त्र्यंबकेश्वर तसेच बोट क्लबबाबत सूचना मांडली. आ. सीमा हिरे यांनी नवश्या गणपती, सोमेश्वर ही तीर्थस्थळे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याची मागणी केली. आ. दीपिका चव्हाण यांनी मांगीतुंगीसह साल्हेर व मुल्हेर ही स्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. आ. डॉ. राहुल अहेर यांनी चांदवडच्या रंगमहालाला हेरिटेजचा दर्जा देऊन तेथे हेरिटेज हॉटेल सुरू करण्याची सूचना केली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नाशिकला पर्यटनाच्या दृष्टीने एक स्वतंत्र विभागीयकेंद्र सुरू करण्याची सूचना मांडली. (प्रतिनिधी)