शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएम’मधील पोकळी भरण्यासाठी सीमीची धडपड

By admin | Updated: October 22, 2014 06:09 IST

देशभरात झालेल्या कारवायांनंतर इंडियन मुजाहिद्दीनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सीमीची धडपड सुरू असल्याचे निरीक्षण सुरक्षा यंत्रणांनी नोंदविले आहे.

मुंबई : देशभरात झालेल्या कारवायांनंतर इंडियन मुजाहिद्दीनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सीमीची धडपड सुरू असल्याचे निरीक्षण सुरक्षा यंत्रणांनी नोंदविले आहे. १० आॅक्टोबर रोजी पुण्याच्या फरासखाना परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटामागे सीमीच्या मध्य प्रदेशातील मॉड्युलचा हात असावा, असा दाट संशय राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून व्यक्त होत आहे. एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फरासखाना येथे बॉम्ब पेरणारे कोण, या बॉम्बस्फोटाचा कट आखणारे कोण, याची इत्थंभूत माहिती मिळाली असून संबंधित अतिरेक्यांचा शोध देशभरातील सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील बीजनोर येथे बॉम्बस्फोट घडविणारे सीमीचे मध्य प्रदेशातील मॉड्युलच फरासखाना बॉम्बस्फोटाच्या मागे आहे. विशेष म्हणजे याच मॉड्युलने २००६मध्ये केरळात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते. हे प्रशिक्षण मुजाहिद्दीनचा अतिरेकी तौकीरने दिल्याची माहिती मिळते. याशिवाय २०१२मध्ये महाराष्ट्र एटीएसने सीमीच्या अतिरेक्यांची धरपकड केली होती. त्यात गजाआड झालेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून मध्य प्रदेशातील मॉड्युल महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रुजविण्याच्या प्रयत्नात होते. वेळप्रसंगी मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांनी, स्लीपर सेलनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले होते. देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी एकाचवेळी सुरू केलेल्या कारवायांमुळे मुजाहिद्दीनचे कंबरडे मोडले. मुजाहिद्दीन संपली, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. नेमकी हीच संधी साधून सीमीने फरासखाना येथे स्फोट घडवून भारतात दहशतवादी संघटनांचे अस्तित्व कायम असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना दिला. मुजाहिद्दीनचे कंबरडे मोडलेले असताना हा स्फोट कोणी घडविला असेल, या विचाराने सुरक्षा यंत्रणा बुचकळ्यात पडल्या होत्या. मात्र यात सीमीचा सहभाग असल्याचे धागेदोरे सापडले आहेत. त्यामुळे इंडियन मुजाहिद्दीनमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सीमी धडपड करीत असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणा वर्तवितात. (प्रतिनिधी)