शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’मुळे अंधाराच्या दारी येईल प्रकाश!

By admin | Updated: September 15, 2016 04:10 IST

जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.

विकास पाटील,  जळगावजलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. एखाद्यावर्षी दुष्काळ आला तरी त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद बळीराजाकडे येईल,असे कविवर्य ना. धो. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अवघ्या मऱ्हाटी मुलुखाला निसगकवी म्हणून सुपरिचित असलेले महानोर शुक्रवारी (१६ सप्टेंबर) अमृतमहोत्वी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी पळासखेड्यातील साद घालणाऱ्या निसर्गाला कवेत घेत बळीराजाच्या कष्टापासून ते गावागावांमधील लिहिण्यासाठी पुढे येत असलेल्या तरुणाईचे भरभरुन कौतुक केले.पळासखेडे या माझ्या २००-३०० उंबरठ्यांच्या गावाने माझ्यावर संस्कार केले. वाचनामुळे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली. सध्या वाचन संस्कृती कमी झाली आहे, हे खरं असले तरी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने वाचनात गुंतल्याचे दिसून येते. खेड्यापाड्यातून चांगल्या कथा, कादंबऱ्या येत असून त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होत आहे. या सगळ्यांशी मी मैत्र बांधून आहे. आतापर्यंत जे साहित्यात दिसले नाही ते आता येऊ लागले आहे. लेखक, कवींनी साधना करावी, घाई न करता पुर्नलेखन करावे, असे केल्यास कसदार व पोत असलेल्या साहित्याची निर्मिती होईल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामती व पद्मश्री भवरलाल जैन, जळगाव यांच्या जैन उद्योग समुहाशी घट्टपणाने जोडून मला काम करता आले, हे माझे भाग्य मी समजतो. या कृषी पंढरीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वर्ष, दोन वर्षातून एकदा तरी भेट द्यावी. असे कळकळीचे आवाहनही केले. महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर नितांत प्रेम केले. माझ्या कवितेचे गाणे केले. कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे जगण्याला बळ मिळाले. जनतेचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन आता उर्वरित आयुष्य शेतावरच घालविणार असल्याचे महानोर यांनी सांगितले.