शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये डोकावणे चिमुरडीच्या जिवावर बेतले

By admin | Updated: May 7, 2017 05:16 IST

लिफ्ट वर-खाली कशी होते, हे पाहण्यासाठी कुतूहलाने लिफ्टमध्ये डोकावणे शनिवारी एका १२ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतले. बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लिफ्ट वर-खाली कशी होते, हे पाहण्यासाठी कुतूहलाने लिफ्टमध्ये डोकावणे शनिवारी एका १२ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सहाव्या मजल्यावर तिने लिफ्टमध्ये डोकावताच वरच्या मजल्यावरून आलेल्या लिफ्टमुळे ती चिरडली गेली. कुंडू आरिफ झवेरी (१२) असे मुलीचे नाव असून, या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वांद्रे पूर्वेकडील बेहराम पाड्यात आशियाना या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कुंडू कुटुंबीयांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी ७च्या सुमारास ती आतेबहिणीसोबत खेळत होती. त्याच दरम्यान लिफ्ट खाली-वर कशी होते, या कुतूहलातून तिने सहाव्या मजल्यावरून खाली डोकावून पाहिले. त्याच दरम्यान सातव्या मजल्यावर असलेली लिफ्ट खाली येताच कुंडूच्या डोक्यावर आदळली. तिला तत्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला उपचारादरम्यान पावणेआठच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वासुदेव जमदाडे यांनी दिली.