शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

संतसाहित्य, आधुनिकतेचा संबंध मांडणार

By admin | Updated: December 10, 2014 23:18 IST

साहित्याचा आधुनिक साहित्याशी असलेला संबंध संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडणार असल्याचे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

सदानंद मोरे : घुमान संमेलनाच्या व्यासपीठावर मत नोंदविणार
पुणो :  घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत यंदाचे साहित्य संमेलन होत आहे. संत साहित्याचा अभ्यासक या नात्याने संत साहित्याचा आधुनिक साहित्याशी असलेला संबंध संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडणार असल्याचे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. 
88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना अध्यक्षपदाची भूमिका विशद केली. तसेच मराठी भाषेशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संमेलनाध्यक्षपद ही एक खूप मोठी जबाबदारी आहे, महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी माङयावर जो विश्वास दाखविला, तो सार्थकी करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. 
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे, असे विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच केले होते, त्याबद्दल बोलताना साहित्य किंवा संमेलन हा संस्कृतीचा एक भाग आहे. ज्या लोकांना वेळ आहे तेच साहित्याचे उद्योग करू शकतात. रिकाम्या वेळेशिवाय साहित्य निर्माण होत नाही अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.   (प्रतिनिधी)
 
4आज जागतिकीकरणाच्या प्रवाहात भाषा, संस्कृती धोक्यात आली आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपण कोण आहोत, आपली पाळेमुळे काय आहेत याचा विचार झाला पाहिजे. साहित्यिकांनी भूतकाळ आणि वर्तमानकाळातील परिस्थितीचा विचार करून वास्तवावर संवेदनशीलतने आणि तितकेच निर्भीडपणो लेखन केले पाहिजे, असे डॉ. मोरे म्हणाले.
 
भाषासक्तीचा 
नीट विचार व्हावा
4  सध्या राज्यातील इंग्रजी शाळा बंद करून मराठी भाषेची सक्ती शाळांमध्ये केली पाहिजे, असा एक विचारप्रवाह पुढे येत आहे. 
4 मात्र, सक्ती करणो योग्य नाही. मूल आईपासून का तुटते? त्याला पुरेसे दूध पुरत नाही का? अशा दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.
4 भाषेच्या सक्तीचा नीट विचार केला पाहिजे. भाषा सल्लागार समितीने भाषेचे धोरण करण्यासंबंधी जो मसुदा शासनाला दिला आहे, त्याचा सारांश लक्षात घेतला पाहिजे. 
 
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करेन
ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्य संमेलनाध्यक्षपद बिनविरोध मिळावे हे तत्त्वत: मान्य आहे. या पदाचा मान राखला गेला पाहिजे. आगामी काळात संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करेन.
 - डॉ. सदानंद मोरे
संत परंपरेशी बाबांचा वयाच्या दहाव्या वर्षापासून जेनेटिक संबंध आहे. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. घुमान साहित्य संमेलनाला ते संमेलनाध्यक्ष म्हणून निश्चित न्याय देतील, असा माझा विश्वास आहे.
- अमृता मोरे ( डॉ. सदानंद मोरे यांची कन्या) 
 
यंदाच्या निवडणुकीत मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागृती झाल्याने विक्रमी मतदान झाले. सर्वानी एकमताने डॉ. मोरे यांच्या बाजूने मतदानातून कौल दिला. मतदारांच्या इच्छेप्रमाणो त्यांची निवड योग्य असू शकते.
- भारत सासणो
 
 
 
डॉ. सदानंद मोरे सरांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचा खूप आनंद आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले ते प्राध्यापक आहेत. संत साहित्य, धर्म, भक्ती याकडे पाहण्याची त्यांनी वेगळी दृष्टी दिली. संत साहित्याची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे. - सचिन पवार  (विद्यार्थी)
संत साहित्याचे अभ्यासक असल्यामुळे सरांची संमेलनाध्यक्षपदी निवड होणो अपेक्षितच होते. निवडणुकीत आम्ही काही मदत करू का? असे त्यांना विचारले होते; पण माङया पातळीवर मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.
 - मारुती अवरगंड ( विद्यार्थी) 
 
सदानंद मोरे यांचा अल्पपरिचय
1 लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, कीर्तनकार अशी ओळख. तत्त्वज्ञान तसेच  प्राचीन संस्कृती व इतिहास विषयावर कला शाखेच्या दोन पदव्युत्तर (एमए) पदवी संपादित.  
2 ‘ द गीता- अ थिअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’ यावर  पीएच.डी. सवरेत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्काराचे मानकरी. 
3 विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या  ‘करिअर अवॉर्ड’ अंतर्गत ‘कृष्ण : द मॅन अँंड हिज मिशन’ या विषयावर संशोधन. 
4 संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्याशाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून मान्यता. 
5 पुणो विद्यापीठांतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत. 
6 ‘द गीता : थिअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’, गीतारहस्याची निर्मिती’ तसेच  ‘पालखी सोहळा’, ‘ताटीचे अभंग’, ‘ज्ञानबा-तुकाराम’ यांसारख्या  संत साहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन, संपादन. 
7 विविध चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळेतून शोधनिबंधाचे वाचन, व्याख्याने. 
8 तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह विविध 15 संस्थांच्या पुरस्काराने सन्मानित.  
9 ‘उजळल्या दिशा’ या नाटकासाठी राज्य शासनासह विविध पुरस्कारांचे मानकरी.