शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

चला, गिधाड वाचवू या!

By admin | Updated: January 2, 2015 01:54 IST

गिधाडांची घटत जाणारी संख्या वाढावी, गिधाडांचे संवर्धन व्हावे आणि त्यांना संरक्षण मिळावे म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने कोकणात ‘जटायू महोत्सव’ हाती घेण्यात आला

मुंबई : गिधाडांची घटत जाणारी संख्या वाढावी, गिधाडांचे संवर्धन व्हावे आणि त्यांना संरक्षण मिळावे म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने कोकणात ‘जटायू महोत्सव’ हाती घेण्यात आला असून, या अंतर्गत आयोजित स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या गावांसाठी एकूण ५० हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.गिधाड संवर्धन स्पर्धेसाठी सह्याद्रीने दोन गट केले आहेत. पहिल्या गटात गिधाडांची घरटी असणारी गावे आणि दुसऱ्या गटात गिधाडांची घरटी नाहीत अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचा कालावधी १६ जानेवारी ते २५ मार्च असा आहे. या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना गिधाड संरक्षण, डायक्लोफेनॅकचा वापर गुरांच्या उपचारासाठी करू नये, गिधाडासंबंधी जनजागृती यांसारखी कामे संस्थेच्या मदतीने करणे अपेक्षित आहे. प्रत्येक कामासाठी स्पर्धकांना ठरावीक गुण देण्यात येतील.सहभागी गावांना संस्थेतर्फे गिधाड संरक्षणाची कार्यशाळा, जनजागृतीसाठी प्रदर्शनी साहित्य, फलक अशा विविध गोष्टी मोफत दिल्या जातील. शिवाय तज्ज्ञांमार्फत सहभागी गावांच्या कामांची पाहणी केली जाईल; आणि अधिकाधिक गुण मिळविणाऱ्या गावांना विजयी घोषित केले जाईल. १५ जानेवारीपर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. इच्छुकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी सह्याद्री निसर्ग मित्र, ११, युनायटेड पार्क, मार्कंडी, चिपळून, पिन : ४१५६०५ या पत्त्यावर संपर्क साधावा. अथवा २ंँ८ं१्रिूस्रल्ल@ॅें्र’.ूङ्मे या ईमेलवर संपर्क करता येईल. (प्रतिनिधी)च्सह्याद्री निसर्ग मित्र आणि सी.ई.पी.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम घाटाच्या उत्तर विभागातील गिधाडांचे संवर्धन व संरक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे.च्कोकण परिसरात केलेल्या सर्वेक्षणानुसार, श्रीवर्धन, चिरगाव, नाणेमाची आणि विहली येथे गिधाडांच्या वसाहती आढळून आल्या आहेत. या वसाहतींना स्थानिकांच्या मदतीने संरक्षण देण्याचे काम केले जात आहे.सहभागी गावांना संस्थेतर्फे गिधाड संरक्षणाची कार्यशाळा, जनजागृतीसाठी प्रदर्शनी साहित्य, फलक अशा विविध गोष्टी मोफत दिल्या जातील.च्गिधाडांची संख्या कमी होत असल्याने ती वाढावी म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र काम करत आहे.च्रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिधाडांच्या संवर्धनासह संरक्षण आणि जनजागृतीसाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.