फ्लेमिंगो, ओपन बेल, किंग फिशर, च:हाटी, विविध प्रकारचे बदक अशा समृद्ध पक्षी सृष्टी. नदीतील ताज्या माशांची मेजवाणी..धारोष्ण दूध..हुरडा..अशा निसर्गसमृद्ध सहलीचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. उजनी जलायशय परिसरातील शेतक:यांनी एकत्र येत पहिल्या ‘फ्लेमिंगो टूर’चे आयोजन केले आहे.
पुण्यापासून 12क् किलोमीटर अंतरावर उजनी पाणलोट क्षेत्रतील कुंभारगाव येथे वीस शेतक:यांनी एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे. एकाच वेळी 5क् पर्यटक राहू शकतील अशी सुविधा येथे निर्माण करण्यात आली आहे. उजनी जलयाशयात विविध प्रकारच्या शेकडो पक्षांच्या प्रजाती पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने फ्लेमिंगो पक्ष्यांचा समावेश आहे. नोव्हेंबरअखेरीस या पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. तर मे अखेर्पयत या पक्ष्यांचा येथेच मुक्काम असतो. तसेच तसेच किंगफिशर, बटवा, हळदी कुंकवु बदक अशा पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतात.
4महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) निवास व न्याहारी योजनेअंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
4वन्यजीव छायाचित्रकारांसह सामान्य पर्यटकांनादेखील बोटीतून अगदी जवळून पक्ष्यांचे जग पाहायला मिळणार आहे.
4शेतातून काढलेल्या उसाचा ताजा रस, धारोष्ण दूध,
दही, तूप अशी अस्सल ग्रामीण मेजवानीदेखील असेल.
4याशिवाय मांसाहार करणा:यांना नदीतून काढलेल्या ताज्या राहू, कतला, चिलापी, मरळ या माशांची चव चाखालया मिळणार आहे.
4स्थानिक बचत गटांनी तयार केलेल्या कुरडया, पापडय़ा या खाद्यपदार्थाची खरेदीदेखील करता येईल. ग्रामीण व नैसर्गिक जीवनाचे जवळून दर्शन घेऊ इच्छिणा:या पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
मी उजनीतील धरणग्रस्त आहे. कुटुंबाची 22 एकर शेती होती. त्यातील 2क् एकर शेती पाण्यात गेली आहे. माङो आठवी शिक्षण झाले आहे. शाळेत असताना शिक्षकांनी पक्षी-जीवनाची माहिती दिली होती. पुढे त्यांच्याच मदतीने पक्ष्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी गावातील तरुणांनी गस्ती पथक तयार केले. त्यामुळे पक्षी संवर्धन होऊ शकले. आता या उपक्रमामार्फत येथे येणा:या पर्यटकांना येथील सर्व पक्षांची माहिती, त्यांचे नैसर्गिक जीवन, अंडी उबविण्याच्या जागा यांची माहिती दिली जाते.
- दत्तात्रय नगरे, उपक्रमातील सदस्य