शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

शिक्षकांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत धडे

By admin | Updated: September 5, 2016 02:16 IST

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील मैत्रीचे नाते जेव्हा अधिक घट्ट होते, तेव्हाच शिक्षणाचे आदान-प्रदान अत्यंत सुरळीत होते.

मुंबई : शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील मैत्रीचे नाते जेव्हा अधिक घट्ट होते, तेव्हाच शिक्षणाचे आदान-प्रदान अत्यंत सुरळीत होते. त्यामुळे हे नाते अधिक दृढ व्हायला हवे, असे मत प्राचार्य डॉ. सचिन लढ्ढा यांनी शिक्षक दिन विशेष कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. शिक्षकांच्या भूमिकेतून बाहेर पडत, या वेळी शिक्षकांनी विद्यार्थी जीवनाचा अनुभव पुन्हा अनुभवत ‘शिक्षक दिन’ विद्यार्थ्यांसोबत घालवला.शिक्षक दिनाचे औचित्य साधत एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतनमध्ये शिक्षकांसाठी विशेष वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीव्हीपीच्या विद्यार्थिनींनी आवडत्या शिक्षकांसाठी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा वर्ग आयोजित केला. या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा अभ्यास तपासला, तोंडी परीक्षा घेतली. प्रसंगी चुकीच्या उत्तरावर शिक्षकांनाही ओरडा पडला. या वेळी वेगवेगळ्या विभागांच्या विद्यार्थिनींनी आवडत्या शिक्षकांना स्वत: बनविलेल्या वस्तू भेट दिल्या. भावपूर्ण कविता, नृत्य सादर करत विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. प्रा.संजय देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या आवडीची गाणी म्हटली, तर प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी ‘टीचर मेड मी टीचर’ कविता सादर करीत आपल्या शिक्षकांचे आभार मानले. या वेळी शिक्षकांसाठी एक विशेष स्पर्धा घेण्यात आली. ज्या शिक्षकांनी विद्यार्थी भूमिका अत्यंत चोखपणे बजावली, अशा शिक्षकांना बक्षिसे देण्यात आली. यात प्राध्यापक स्मृती तावडे आणि इलेक्ट्रॉनिक विभागाचे अरविंद मिश्रा यांना बेस्ट टीचर इन स्टुडंट रोलचे पारितोषिक मिळवले, तर संजय माने आणि फार्मसी विभागाच्या श्रद्धा मेश्राम यांना बेस्ट नॉन-टीचिंग स्टाफ इन स्टुडंट रोल पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी पीव्हीपी तंत्रनिकेतन विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीस स्वाती गर्ग आणि सांस्कृतिक चिटणीस ख्याती बारोट, फार्मसी विभागाच्या ममता पांडे आणि इलेक्ट्रॉनिक विभागाचे भारत काटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)