शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेची संमेलनाच्या समारोपाकडे पाठ

By admin | Updated: February 5, 2017 18:06 IST

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सामारोपाच्या कार्यक्रमाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली.

ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 5 - 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सामारोपाच्या कार्यक्रमाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. शिवसेना पक्षप्रमुखांसोबतच, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हेही संमेलनाच्या समारोपास अनुपस्थित होते. कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर वगळता शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली.
 

भाजपा-राष्ट्रवादीच्या जवळिकीची फारशी चर्चा होऊ नये, यासाठी अधिवेशनाला गैरहजर राहणारे शरद पवार, शिवसेना-भाजपातील राजकीय मतभेदांमुळे मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर येणे टाळणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे अशा उद्घाटन सोहळ्यातील राजकीय अनुपस्थितीनंतर आज (रविवारी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.  

 

मुंबई, ठाण्यासह विविध महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत उद्धव ठाकरे संमेलनाला कसा वेळ देतात आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात कमी पडलेल्या आपल्याच राज्य सरकारचा कसा समाचार घेतात, त्याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.