शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडे चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांची पाठ

By admin | Updated: May 17, 2016 05:41 IST

गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले

मुंबई : प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असतानाच गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या कालावधीत ५१४ नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मोडकळीस आलेल्या बसेस, बस आणि स्थानकांत असलेली अस्वच्छता यामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याचे एसटीचे अधिकारीच सांगतात. याचा परिणाम प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर होत आहे. अवैध वाहतुकीचाही मोठा फटका महामंडळाला बसत आहे. अवैध वाहतुकीमुळे तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्नही बुडत आहे. एसटीची प्रवासीसंख्या २0१२-१३मध्ये २६१ कोटी ३७ लाख होती. हीच संख्या २0१५-१६मध्ये २४५ कोटी १0 लाख झाली. जवळपास १६ कोटी २७ लाख प्रवासी कमी झाले आहेत. एसटी महामंडळाला हा सर्वांत मोठा फटका बसला असून, त्यामुळे उत्पन्नही कमी झाले आहे. नवीन गाड्या वाढविण्यावरही भर दिल्याचे दिसत नाही. महामंडळाच्या ताफ्यात २0१२-१३ साली १७ हजार ४९७ बस होत्या. २0१३-१४मध्ये ५५८ बसची भर पडली. त्यानंतरच्या वर्षात ९८ बसेस कमी झाल्या. २0१५-१६मध्ये ५४ बसची भर पडली. आता एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या ही १८ हजार ११ आहे. ताफ्यात गेल्या चार वर्षांत अवघ्या ५१४ नव्या बस दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या बस ८ हजार किमी एवढ्या धावल्या की, सेवेतून बाहेर काढल्या जातात. वर्षाला साधारपणे ३ हजार बसेस मोडीत काढल्या जातात आणि तेवढ्याच ताफ्यात दाखल करून घेणे आवश्यक असते. मात्र हे प्रमाण पूर्ण केले जात नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे.