शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा, मुंबईत बिबट्या सफारी

By admin | Updated: October 4, 2015 04:06 IST

मुंबईच्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व चंद्रपूरमध्ये ताडोबानजीक बिबट्या सफारी उभारण्यात येणार आहे. राज्याच्या विविध भागांत सापडणाऱ्या बिबट्यांना

- यदु जोशी,  मुंबईमुंबईच्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व चंद्रपूरमध्ये ताडोबानजीक बिबट्या सफारी उभारण्यात येणार आहे. राज्याच्या विविध भागांत सापडणाऱ्या बिबट्यांना या ठिकाणी आणले जाईल. बिबट्या एखाद्या घरात घुसला, गावात घुसून दहशत पसरविली, कुणावर हल्ला केला, अशा बातम्या अनेकदा येत असतात. अशा वेळी या बिबट्यांना पकडून नंतर जंगलात सोडून दिले जाते. आता संजय गांधी उद्यान किंवा ताडोबा हा त्यांचा स्थायी पत्ता असेल. पर्यटकांना या सफारींचा आनंद घेता यावा यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था असेल. या सफारीमुळे एकाच परिसरात वाघ आणि बिबटे बघण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील वन्यजीव मंडळाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, की लवकरच याबाबतची मान्यता मिळेल. संजय गांधी उद्यानातील बिबटे सफारीला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून तत्त्वत: मान्यता मिळाली असून, त्या मान्यतेच्या आधीन राहूनच राज्य वन्यजीव मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. संजय गांधी उद्यानात बिबट्या सफारीसाठी मॅफको व सिंहविहाराच्या सीमेलगत २५ हेक्टर जागा निश्चित केली आहे. ताडोबा बफर क्षेत्राच्या बाहेर बिबट सफारी उभारण्याची योजना आहे. दोन्ही ठिकाणी फुलपाखरू उद्यानसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली व ताडोबा व्याघ्रप्रकल्पानजीक फुलपाखरू उद्यान उभारण्यात येणार आहे. वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये मंगलोरनजीक उभारलेल्या फुलपाखरू उद्यानाच्या धर्तीवर ही उद्याने असतील. वन्यजीव विकास निधी स्थापणारवन्यजीवांवर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांच्या खर्चाच्या २ टक्के रक्कम ही वन्यजीव क्षेत्राच्या विकासासाठी घेण्यात येणार आहे. त्यासाठी वन्यजीव विकास निधी स्थापन करण्यात येणार आहे. तिलारीत अभयारण्यसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी घाटात वन्यजीव अभयारण्य उभारण्याचेही प्रस्तावित आहे. या भागात वाघ, हत्ती, स्लेंडरलोरीस,किंग कोब्रा, धनेश, गवा, सांबर, बिबट, भेकर, अस्वल आदी प्राणी आढळतात.