शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या तावडीतून पोटच्या गोळ्याची सुटका

By admin | Updated: October 11, 2015 03:58 IST

बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एक वर्षाच्या ‘कृष्णा’ला माता-पित्याने जिवाची बाजी लावून मोठ्या धाडसाने वाचविल्याची घटना संगमनेर-अकोले रस्त्यावर कोकणेवाडी

संगमनेर (अहमदनगर) : बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एक वर्षाच्या ‘कृष्णा’ला माता-पित्याने जिवाची बाजी लावून मोठ्या धाडसाने वाचविल्याची घटना संगमनेर-अकोले रस्त्यावर कोकणेवाडी शिवारात घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे.संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावातील भाऊसाहेब खताळ हे पत्नी रंजना व एक वर्षाचा मुलगा कृष्णासह गुरुवारी रात्री सुगाव (ता. अकोले) येथून दुचाकीवरून घरी परतत होते. संगमनेर-अकोले रस्त्यावरून जात असताना कोकणेवाडी शिवारात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. बिबट्याने रंजना यांच्या पायाला कडाडून चावा घेतला. बिबट्याच्या हल्ल्याने दुचाकी घसरून खताळ दाम्पत्य रस्त्यावर पडले. त्याचवेळी बिबट्या चिमुकल्या कृष्णाच्या दिशेने रोख धरीत त्याच्यावर चाल करून आला असता रंजना यांनी पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावली. त्यांनी कृष्णाला साडीच्या पदरात झाकले, तर भाऊसाहेब यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने शेतात धूम ठोकली. (प्रतिनिधी)एकाच बिबट्याचे तीन हल्लेसंबंधित घटना घडण्याच्या अगोदर बिबट्याने याच भागात एका दुचाकीवरील तरुणावर हल्ला केला, परंतु नशीब बलवत्तर म्हणून तो सुटला. त्यानंतर काही वेळातच झोडगे वस्तीनजीक संगमनेरहून दुचाकीवरून अकोल्याकडे निघालेल्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला करून पुष्पा मेंगाळ यांच्या पायास चावा घेतला. त्यानंतर तिसऱ्यांदा बिबट्याच्या हल्ल्यातून खताळ दाम्पत्य बचावले. बिबट्याला पकडण्यासाठी उपविभागीय वन अधिकारी मच्छिंद्र गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकणेवाडी शिवारात घटनास्थळाच्या परिसरात वन विभागातर्फे पिंजरा लावण्यात आला आहे. - बाबासाहेब काळे, वनपाल