शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दाढ येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 13, 2016 18:52 IST

हरणधोंडाई रस्त्यावरील ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला क्रेनच्या सहाय्याने पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.

ऑनलाइन लोकमतलोणी (अहमदनगर), दि. 13 - राहाता तालुक्यातील दाढ बु़. येथील चिंचपुरकडे जाणाऱ्या हरणधोंडाई रस्त्यावरील ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला क्रेनच्या सहाय्याने पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले़ दाढ बु़ येथील हरणधोंडाई रस्त्यावर किसन भिकाजी वाकचौरे व सर्जेराव भिकाजी वाकचौरे यांची गट नंबर ३८४ मधील शेतजमिनीत ४५ फुट सामाईक विहिर आहे़ याच विहिरीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन वर्ष वयाचा बिबट्या पडला़ विहिर कोरडी असल्याने या विहिरीकडे कुणाचे लक्ष गेले नाही़ याच परिसरातील काही शालेय विद्यार्थी रस्त्याने जात असताना त्यांना विहिरीतुन बिबट्याची डरकाळी ऐकु आली़ तयांनी शेजारी राहणारे पांडुतात्या बनसोडे यांना ही गोष्ट सांगितली़ बनसोडे व दाढचे माजी सरपंच गोरख तांबे यांनी विहिरीकडे धाव घेतली़ विहिरीच्या तळाशी खडकावर बिबट्या असल्याचे त्यांना दिसुन आले़ त्यांनी घटनेची माहिती कोपरगाव विभागाचे वनपाल पी़ आऱ गावडे यांना दिली़ त्यांनी शिर्डी विभागाचे वनरक्षक डी़बी़ झिंजुर्डे व जी़बी़ सुरसे यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले़ ऐव्हाना बिबट्या विहिरीत पडल्याची वार्ता परिसरात पसरली़ त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती़ लोणी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक बी़व्ही़ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल ए़डी़ शिंदे, यु़ई़ भोसले, डी़यु़ खैरे यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले़ मंगळवारी रात्री अंधार झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला़ दिड तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला, त्यानंतर त्याला वर काढण्यात आले़ या बिबट्याला अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़