शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे रेकॉर्डब्रेक कामकाज

By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST

सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, टोलमुक्ती, शेतक-यांचे पॅकेज, मुंबईचा विकास आदी सर्व विषयात सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. गारपीट, अवकाळी पाऊसाने पिडीत शेतक-यांना सरकारने आतापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकूण दहा हजार कोटींची मदत दिली. ऊस उत्पादक शेतक-यांच्या एफआरपीसाठी २ हजार कोटींच्या कर्जाची घोषणा करण्यायत आली असून त्यामुळे शेतक-यांना प्रतिटन २२५ रुपये मिळणार आहेत. शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईच्या विकासासाठी मेट्रो, मोनोसह सिडकोच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. युती सरकार सत्तेत आल्यापासून अपराधसिध्दीचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च अखेरीस हा दर ३८ टक्कयांपर्यंत पोहचले आहे. नागपूरच्या तुरुंगातून कैद्यांचे पलायन गंभीर घटना आहे. नागपूर तुरुंगात शंभरहून अधिक मोबाईल असून तुरुंगफोडीची घटना घडू शकते, असा स्पष्ट इशारा मागील सरकारला मिळाला होता. मात्र, या अहवालावर मागील सरकारने कारवाई केल्या नसल्याचा आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)