शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी वर्गासाठी कायदा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला

By admin | Updated: July 21, 2016 22:24 IST

राज्यात अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेल्या शिकवणी वर्गांसाठी कायदा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला आहे. यात हस्तक्षेप करणे कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण ठरेल, असे निरीक्षण

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि.21 -  राज्यात अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेल्या शिकवणी वर्गांसाठी कायदा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला आहे. यात हस्तक्षेप करणे कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण ठरेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नोंदवून संबंधित जनहित याचिका फेटाळून लावली.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणात निर्णय दिला. कोणत्या विषयावर कायदा व नियम तयार करायचे, हा कायदेमंडळाचा अधिकार आहे. त्यानुसार शिकवणी वर्ग नियंत्रित करण्याची बाब कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात येते. न्यायालय यासंदर्भात शासनाला काहीच निर्देश देऊ शकत नाही, असे मतही न्यायालयाने याचिका फेटाळताना व्यक्त केले.नीरज वाघमारे यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यात सर्वत्र शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. रहिवासी इमारतीत शिकवणी वर्ग चालविले जात आहेत. हा रहिवासी इमारतीचा व्यावसायिक उपयोग आहे. परंतु, त्यानुसार कर व वीज बिल भरले जात नाही. शिकवणी वर्गाचे संचालक आयकरही जमा करीत नाहीत. यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा साचला आहे. शिकवणी वर्गातील शिक्षकांसाठी काहीच पात्रता निकष नाही. कोणीही विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो. शिकवणी वर्गाच्या शुल्कात समानता नाही. प्रत्येक जण मनमानी पद्धतीने शुल्क आकारत आहेत. अनेक शिकवणी वर्गात अनुदानित महाविद्यालये व शाळांतील शिक्षक सेवा देतात. यामुळे अशा शिक्षकांचे महाविद्यालय व शाळेत शिकविण्यात मन लागत नाही. परिणामी यासंदर्भात कायदा करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.