शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदारच मारतात विधानसभेत ‘पिचकारी’

By admin | Updated: July 2, 2015 00:34 IST

सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे व तंबाखू खाऊन थुंकण्यास तीन हजारांचा दंड करण्याचा कायदा असताना अधिवेशनकाळात विधिमंडळ परिसरात

नाशिक : सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे व तंबाखू खाऊन थुंकण्यास तीन हजारांचा दंड करण्याचा कायदा असताना अधिवेशनकाळात विधिमंडळ परिसरात चक्क आमदारच सिगारेट ओढतात आणि विधानसभेत सभागृहात पिचकाऱ्या मारतात, असा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला.जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाजन यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक किस्से सांगितले. हागणदारीमुक्त अभियान राबवित असताना खान्देशात मात्र लोक गावोगावी रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास बसलेले दिसतात. परदेशात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून, साधा कागदाचा तुकडाही रस्त्यावर फेकला जात नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आणि धूम्रपान करण्यास दंडआहे, असे सांगितले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही भारत सरकारच्या स्वच्छता कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयेदंड आणि तीन महिने साफसफाई व स्वच्छता करण्याची शिक्षा करण्याचा कायदा केला. मात्र हा निर्णय होत नाही तोच बाहेर व्हरांड्यात दोन आमदार धूम्रपान करत असल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकल्याची त्यांनी आठवण करून दिली. एवढेच नव्हे विधानसभेत कामकाज सुरू असताना काही मंडळी स्वच्छ कारपेटवर चक्क पिचकारी मारत असल्याचे आढळून आले आहे. एकीकडे सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानकरण्यास दंड असताना दुसरीकडे आमचीच मंडळी पिचकाऱ्यामारत असल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)