शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

झाड लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका

By admin | Updated: May 26, 2016 01:15 IST

कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही झाड लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला रोख बक्षीस मिळेल.

मुंबई : कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही झाड लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला रोख बक्षीस मिळेल. वन विभागाच्या वतीने येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात अडीच कोटी झाडे लावली जाणार आहेत. त्यात लोकसहभाग असावा म्हणून सेल्फीसह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज लोकमतला ही माहिती दिली. सेल्फी स्पर्धेचे स्वरूप लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अडीच कोटीपैकी दीड कोटी झाडे ही वन विभागातर्फे लावण्यात येणार आहेत. ५० लाख झाडे रेल्वेच्या जागांमध्ये वा रेल्वेच्या वतीने लावण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहे. शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकामसह विविध शासकीय विभाग या महाअभियानात सहभागी होणार आहेत. वन विभागाशिवाय अन्य विभागांकडून ५० लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लावलेल्या प्रत्येक झाडाची माहिती, ते कोठे लावले आहे, ते जगविण्याची जबाबदारी कोणावर आहे याचा संगणकीकृत डाटा तयार करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)साबरमतीच्या धर्तीवर चंद्रभागेचा विकासअहमदाबादमधील साबरमती नदीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच तेथील कामांची पाहणी करणार आहेत. साबरमतीच्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ मोहीम राबविली जाणार आहे.