शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 21:54 IST

मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा (करमळी) दरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्सप्रेसला" सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे थांबा द्यावा

ऑनलाइन लोकमत

कणकवली(सिंधुदुर्ग), दि. 23 - मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा (करमळी)  दरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्सप्रेस"ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे थांबा द्यावा अशी मागणी एका पत्राद्वारे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात, भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा करमळी दरम्यान अतिशय वेगवान वातानुकूलित सुसज्ज अशी तेजस एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर सुरु केली आहे. त्याबद्दल आपले आभार मानतो. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि कुडाळ असे थांबे देण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवासी ये - जा करीत असतात. तेजस एक्सप्रेसला कणकवली रेल्वे स्थानकावर थांबा न दिल्याने सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड, वैभववाडी आदी तालुक्यातील असंख्य गावातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार नाही. त्यामुळे या प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून कणकवली येथे या एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा,असे म्हटले आहे.