शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी आघाडी

By admin | Updated: January 17, 2017 04:58 IST

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली असून काँग्रेस तीन, राष्ट्रवादी एक तर कोकणची जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आली.दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा व विधान परिषद निवडणुकांबाबत चर्चा करण्यास टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सोमवारी बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याच्या उमेदवार निवडीसाठी पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक २४ आणि २५ जानेवारी रोजी मुंबईत होणार असून, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची निवड ३० आणि ३१ जानेवारी रोजी होईल. महानरपालिका निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी २७ आणि २८ जानेवारी रोजी बैठक होणार आहे.या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले की, नाशिक व अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ या तीन जागा काँग्रेस पक्ष लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे. कोकण शिक्षण मतदारसंघात दोन्ही पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, एमआयएम या जातीयवादी पक्षांना वगळून इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, आघाडी करण्याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आले असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.या बैठकीला प्रदेशाध्यक्षांसह महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, आदी नेते उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)>महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, एमआयएम या जातीयवादी पक्षांना वगळून इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका आहे.- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष