शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पोेस्टाच्या तिकिटांवर येणार संघाचे नेते

By admin | Updated: August 3, 2015 01:53 IST

नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपली वैचारिक बैठक टपाल तिकिटांमधूनही प्रतिबिंबित करण्याचे ठरविले असून, टपाल तिकिटांवरील इंदिरा

नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपली वैचारिक बैठक टपाल तिकिटांमधूनही प्रतिबिंबित करण्याचे ठरविले असून, टपाल तिकिटांवरील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या चित्रांची सद्दी संपवून त्याऐवजी श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पं. दीन दयाळ उपाध्याय या संघनेत्यांसह इतर देशभक्तांना स्थान देण्याची तयारी सुरू केली आहे.टपाल खाते ‘कोमेमोरेटिव्ह’ व ‘डेफिनिटिव्ह’ अशा दोन प्रकारची तिकिटे काढत असते. ‘कोमेमोरेटिव्ह’ तिकिटे खास प्रसंगी काढले जातात व त्यांचे वितरण मर्यादित असते. ‘डेफिनिटिव्ह’ तिकिटे ही दैनंदिन वापरासाठी काढली जातात. स्वातंत्र्यापासून काढण्यात आलेल्या दैनंदिन वापराच्या तिकिटांमध्ये इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या तिकिटांचे प्राबल्य दिसून येते. ते असंतुलन दूर करण्याचे नवे धोरण असल्याचे दळणवळणमंत्री रवीशंकर प्रसाद यांचे म्हणणे आहे.महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांची चित्रे असलेल्या दैनंदिन वापराच्या टपाल तिकिटांचे वितरण यापुढेही सुरू राहणार असले तरी इंदिरा व राजीव गांधी यांच्या तिकिटांची नव्याने छपाई बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, संघनेते दीन दयाळ उपाध्याय व श्यामा प्रसाद मुखर्जी, राम मनोहर लोहिया, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगत सिंग, सुभाष चंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर व सुब्रह्मण्यम् भारती यांच्या चित्रांची दैनंदिन वापराची टपाल तिकिटे काढण्यात येणार आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार असे करून ‘ऐतिहासिक चूक’ सुधारण्यात येणार आहे. तसेच पं. भीमसेन जोशी, पं. रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान व एम.एस. सुब्बलक्ष्मी या संगीतरत्नांवर तिकिटे काढण्याचा सरकारचा विचार आहे