शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनो, शांतता... कोर्ट चालू आहे!

By admin | Updated: November 27, 2015 03:12 IST

सभागृहात हमरीतुमरीवर येऊन गोंधळ घालण्याची ‘संस्कृती’ ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र दिसत असली, तरी अशा गोंधळाची थेट न्यायालयाने दखल घेऊन, पोलिसांकरवी समज देण्याची घटना पाटणमध्ये घडली.

सातारा : सभागृहात हमरीतुमरीवर येऊन गोंधळ घालण्याची ‘संस्कृती’ ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र दिसत असली, तरी अशा गोंधळाची थेट न्यायालयाने दखल घेऊन, पोलिसांकरवी समज देण्याची घटना पाटणमध्ये घडली. पंचायत समितीच्या मासिक सभेत आमदार शंभूराज देसाई आणि माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या समर्थक गटांत प्रचंड शाब्दिक चकमक, आरडाओरडा, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न असे प्रकार सुरू होते. पोलिसांना बोलवावे लागेल की काय, अशी चिन्हे असतानाच, प्रत्यक्षात पोलीसच सभागृहात आले. त्यांना पाटण न्यायालयाने पाठविलेले होते, तेही ‘शेजारीच न्यायालयाचे कामकाज सुरू असून, सभापती आणि सभागृहाला समज द्यावी,’ असा आदेश घेऊनच!न्यायालयाची इमारत पंचायत समिती परिसरालगतच आहे. सभागृह दुसऱ्या मजल्यावर आहे. तिथे देसाई-पाटणकर गटांत चाललेल्या वादावादीचा आवाज थेट न्यायालयात पोहोचत होता. अखेर न्यायाधीशांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांना पंचायत समितीच्या सभागृहात पाठविले. सभागृहातील आरडाओरड्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा येत आहे, याची कल्पना गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांना दिली. त्यानंतर सभापती, उपसभापती, सर्व सदस्य आणि अधिकाऱ्यांमार्फत ही बाब सर्वांपर्यंत पोहोचली आणि वातावरण शांत झाले. (प्रतिनिधी)