शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी नेत्यांचा वशिला बिनकामाचा

By admin | Updated: January 4, 2017 18:50 IST

आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या तिकीटवाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतींदरम्यान 'मेरिट'च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे

योगेश पांडे/ ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 4 - आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या तिकीटवाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतींदरम्यान 'मेरिट'च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे नाव तिकीटासाठी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मनपा निवडणूकांत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी शहर कॉंग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नेत्यांमधील आपापसातील वैचारिक मतभेदामुळे पक्षात गट निर्माण झाल्याचे दिसून येत असताना या धोरणाचा कितपत फायदा होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे.आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी उमेदवार अंतिम करण्याच्या दिशेने कॉंग्रेसनेदेखील पावले उचलली आहेत. शहरातील ३८ प्रभागांसाठी पक्षाकडे अकराशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.८ जानेवारीपासून इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. याअगोदर कुठे ना कुठे अमूक नेत्याच्या जवळचा उमेदवार किंवा तमूक गटाचा खास या ओळखीवर तिकीट अंतिम व्हायचे. नेत्यांकडून आपल्या उमेदवारासाठी विशेष शिफारसदेखील करण्यात यायची. अशा स्थितीत मुलाखतींना फारसे महत्त्व राहिले नव्हते व यातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण व्हायचा.यंदाच्या मनपा निवडणूकांत योग्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार शहर कॉंग्रेस कमिटीने  'मेरिट'चे धोरण अवलंबवायचे ठरविले. विशिष्ट गट किंवा नेत्याच्या जवळचा उमेदवार आहे, म्हणून तिकीट अंतिम होणार नाही. संबंधित उमेदवाराचे प्रभागातील काम, जनमानसातील प्रतिमा, कार्यकर्त्यांमधील वावर आणि मुलाखतींमधील एकूण कामगिरी या आधारावरच त्याच्या नावाची तिकीटासाठी शिफारस करण्यात येणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष शहराध्यक्ष राहणार असून समितीत माजी खासदार, आमदार यांच्यासह २२ ते २४ जणांचा समावेश आहे.