शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

सोसायटीला प्रभाग रचनेची लक्ष्मणरेखा

By admin | Updated: January 21, 2017 02:58 IST

एकाच सोसायटीत राहणारे रहिवासी प्रभाग रचनेच्या लक्ष्मणरेखेमुळे दोन भागांत दुभागले गेल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला

मुंबई : एकाच सोसायटीत राहणारे रहिवासी प्रभाग रचनेच्या लक्ष्मणरेखेमुळे दोन भागांत दुभागले गेल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला आहे. येथील मतदार प्रभाग क्रमांक १०५ आणि १०६मध्ये दुभागले गेले आहेत. यापैकी बहुतेक रहिवासी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.मुलुंड पूर्वेकडील नीता अपार्टमेंटमधील मतदार सध्या या नवीन वॉर्ड रचनेमुळे दोन प्रभागांत दुभागले गेले आहेत. नीता अपार्टमेंटच्या ‘एबी’,‘सीडी’ आणि ‘ईएफ’ अशा तीन विंग आहेत. यात एबी आणि सीडीमध्ये प्रत्येकी ६० फ्लॅट्स आहेत. तर ईएफमध्ये ४५ फ्लॅट्स आहेत. एबी आणि सीडीच्या मधूनच चाफेकर बंधू मार्ग गेल्यामुळे या दोन इमारतींचा समावेश प्रभाग क्रमांक १०६मध्ये आहे. हा प्रभाग उत्तरेकडे चाफेकर बंधू मार्ग, पूर्वेकडे ठाणे खाडी, दक्षिणेकडील टी व एस विभाग सामाईक सीमा व पश्चिमेकडे मध्य रेल्वे लाइन्स सीमेअंतर्गत बंदिस्त केलेला आहे. सदर प्रभाग पालिकेच्या नव्या धोरणानुसार हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर विभागांचा मिळून बनविलेला आहे. यामध्ये जुन्या १०० प्रभागातील हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, टाटा कॉलनी आदी विभाग नव्याने समावेश केलेले आहेत.तर दुसरीकडे ‘ईएफ’ आणि ‘सीडी’ या विंगचा काही भाग संत रामदास रोडच्या दिशेने गेला आहे. रामदास रोडचा समावेश १०५मध्ये गेला असल्याने या मतदारांचा समावेश १०५मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच सोसायटीच्या मतदारांना दोन वेगवेगळ्या प्रभागांत मतदान करावे लागणार आहे.