शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नवप्रयोगांना चालना

By admin | Updated: July 1, 2016 02:42 IST

नव्या प्रयोगाला चालना देत सोसायटीचा उत्कर्ष करू पाहणारे उषा कॉम्प्लेक्स भांडुप परिसरातील एक आदर्श सोसायटीचे कुटुंब आहे.

लीनल गावडे,

मुंबई- नव्या प्रयोगाला चालना देत सोसायटीचा उत्कर्ष करू पाहणारे उषा कॉम्प्लेक्स भांडुप परिसरातील एक आदर्श सोसायटीचे कुटुंब आहे.भांडुप पश्चिम येथील भांडुप इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरात ‘उषा कॉम्प्लेक्स’ २००४ सालापासून वसलेले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये १२ इमारती असून, तब्ब्ल ३७१ खोल्या आहेत. भांडुप रेल्वे स्थानकाला समांतर अशी ही सोसायटी असली तरी येथे शहराच्या तुलनेत गोंधळ नसतो. शांत आणि झाडांनी बहरलेली ही सोसायटी नेहमीच येथील नागरिकांना मन:शांती देते. सोसायटीविषयी अध्यक्ष सुनील भोसले सांगतात की, उषा कॉम्प्लेक्स हे कुटुंबच आहे. ज्याप्रमाणे सगळे सणवार साजरे करायला एकत्र जमतात अगदी तसेच कठीण प्रसंगातही साथ देतात. समाजोपयोगी कामे करण्यासाठी सर्व नेहमीच एकत्र येतात. त्यामुळेच नवनवे प्रयोग यशस्वी होतात. यापैकीच एक म्हणजे २००९ ते २०१५ सालापर्यंत सोसायटीची संपूर्ण जबाबदारी महिलांनी स्वीकारली होती. अध्यक्षापासून ते सदस्यांपर्यंत सर्व पदांवर महिला कार्यरत होत्या. सुप्रिया ठोकळ, चैताली मुणगेकर, मंगला भोईटे, हर्षाली वारंग, अक्षया थवी, महानंदा कडलक, जया कंगणकर, प्रभावती गावडे या महिलांनी त्यांच्या कारकिर्दीत सोसायटीत चांगले बदल घडवून आणले आणि सोसायटीला अधिक समृद्ध केले. महिलांकडे सोसायटीचा संपूर्ण अधिकार देणारी ही भांडुप परिसरातील एकमेव सोसायटी आहे, असेच म्हणावे लागेल.वर्षभर विविध उपक्रम राबवत सोसायटीतील एकोपा टिकवून ठेवला जातो. विशेषत: प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व लहानग्यांना कळावे यासाठी लहान मुलांसमवेत हा दिवस साजरा केला जातो. >सणांची रेलचेल सोसायटीत वर्षभर सणांची रेलचेल असते. येथील गणेशोत्सवात तर धमाल असते. सोसायटीतील सारी मंडळी एकवटून दहा दिवस गणपतीच्या सेवेत मग्न होतात. अनाथ मुलांनाही त्यांच्या कला सादर करता याव्यात यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी अनाथ आश्रमातून मुले इमारतीत येऊन त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करतात. याशिवाय होळी, रंगपंचमी, नवरात्र, दसरा, दिवाळी हे सणही मोठ्या उत्साहात पार पडतात.योग शिबिरयोगाचे महत्त्व जाणत सोसायटी गेल्या काही वर्षांपासून योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसोबत या शिबिराला तरुणदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात.>स्वच्छता अभियानकेंद्राच्या ‘स्वच्छता अभियाना’चे महत्त्व जाणत येथे अभियानाचे आयोजन करण्यात येते. अभियानात महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सोसायटीच्या आवाराची मनापासून स्वच्छता करतात. त्यामुळेच आपोआप परिसर स्वच्छ ठेवण्याचा संस्कार मुलांवर होत आहे, असे सुनील भोसले यांनी सांगितले.>युवा मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघटनासोसायटीत युवा मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघटना सक्रिय आहे. या दोघांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आरोग्य तपासणी, आदिवासी पाड्यात शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते.