शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘जलपरी’ला लातूरकरांचा निरोप

By admin | Updated: August 9, 2016 19:47 IST

लातुरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून जलपरीच्या माध्यमातून लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज येणाºया जलपरीला लातूरकरांनी मंगळवारी

ऑनलाइन लोकमत
 
लातूर, दि. 8 -  लातुरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून जलपरीच्या माध्यमातून लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज येणाºया जलपरीला लातूरकरांनी मंगळवारी सकाळी भावपूर्ण निरोप दिला. यानिमित्त ‘जलपरी’च्या चालकांसह रेल्वे प्रशासनातील अधिका-यांचा सत्कार करून लातूरकरांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तर प्रमुख उपस्थिती महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, आयुक्त सुधाकर तेलंग, उपमहापौर चाँदपाशा घावटी, चंद्रकांत चिकटे, एस.आर. देशमुख, विक्रांत गोजमगुंडे, रविशंकर जाधव, मोईज शेख यांची होती. जिल्हाधिकाºयांच्या हस्ते रेल्वे चालक, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाºयांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जलपरीला निरोप देण्यासाठी विविध पक्षांसह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. जलपरीला फुलांनी सजविण्यात आले होते. आज जलपरीची १११ वी फेरी होती. यातून २५ कोटी ७० लाख लिटर पाणीपुरवठा रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. १२ एप्रिलला ‘जलपरी’ची पहिली फेरी लातूर रेल्वेस्थानकावर झाली. १२ ते २२ एप्रिल दरम्यान ५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर २३ एप्रिल ते ९ आॅगस्ट या कालावधीत दर खेपेला २५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. 
 
साडेतीन महिने पुरेल एवढे पाणी... 
टंचाईवर मात करण्याइतपत अद्यापही धरण क्षेत्रात पाणी उपलब्ध नाही. मात्र गेल्या आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे तीन ते साडेतीन महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. भविष्यात पाऊस पडला तर जलपरीची गरज भासणार नाही. यासाठी लातूरकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तेलंग यांनी केले आहे. 
 
सहकार्यामुळे संकटावर मात... 
लातूर शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने केलेले सहकार्य अनमोल आहेत. लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे आदेश प्रशासनाला मिळाले आणि सर्व विभाग आणि रेल्वे प्रशासनासह लातूरकरांच्या सहकार्यामुळे या पाणीटंचाईवर चार महिन्यांमध्ये मात करता आली, असे मत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. 
 
यांचा झाला गौरव... 
लातूरकरांची तहान भागविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाºयांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये लोको पायलट अशोककुमार, सुरक्षा गार्ड ए.आर. शेख, नाईक, गोपाल पाटील, अमोल कांबळे, स्टेशन प्रबंधक घाडगे, मुख्य वाणिज्य निरीक्षक रमेश काळे, मेकॅनिकल इंजिनिअर औसेकर, वाहतूक निरीक्षक मिश्रा, माल पर्यवेक्षक आर.एस. ओव्हळ, वाघमारे, जावेद शेख, श्रीकांत रंगनाथन, निजाम शेख, प्रगती कन्स्ट्रक्शनचे गोविंद माकणे आदींचा मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.