शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

कर्जमाफीसाठी अखेरपर्यंत लढणार

By admin | Updated: April 5, 2017 02:51 IST

रायगड जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पनवेल शहरात मंगळवारी संघर्ष यात्रेचा समारोप झाला.

कळंबोली : रायगड जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पनवेल शहरात मंगळवारी संघर्ष यात्रेचा समारोप झाला. पहिल्यांदाच राजकीय नेत्यांची मांदियाळी शहरात जमल्याने एक प्रकारे राजकीय छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली.शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य राहिलेला पनवेल तालुका सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. काँग्रेस पक्षाने शेकापला कायम टक्कर दिली, मात्र आता दोनही पक्ष विरोधी बाकावर असून त्यांनी सरकारविरोधात आघाडी केली आहे. यात राष्ट्रवादीचाही सहभाग आहे. राष्ट्रवादी व शेकाप रायगड जिल्हा परिषदेत सत्तेत आहेत. त्याचबरोबर पनवेल महापालिका निवडणूक एकत्रित लढणार असल्याने पनवेलला सांगता झालेल्या संघर्ष यात्रेला महत्त्व प्राप्त झाले होते. पनवेलच्या इतिहासात राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी इंदिरा गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह बडे नेते पनवेलला येवून गेले आहेत. परंतु मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी पनवेलला हजेरी लावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, माणिकराव ठाकरे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, भास्करराव जाधव, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील आमदार उपस्थित होते. दोनही काँग्रेसचे सर्व नेते रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एकत्र आल्याने त्यांचे भाषण ऐकण्याकरिता रायगडसह राज्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.>पनवेल लालबावटामयसंघर्ष यात्रेच्या सांगता समारंभाची जवळपास पूर्ण जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाने उचलली होती. त्यांना दोनही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. मात्र या माध्यमातून शेकापने शक्तिप्रदर्शन करीत भाजपावर कुरघोडी केली. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात लालबावटा असणारे झेंडे लावण्यात आले होते. त्याचबरोबर यात्रेत आलेल्या आमदार तसेच इतरांचे स्वागत सुद्धा शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. भव्य दिव्य स्वरूपाचा स्टेज उभारण्यात आला होता. त्या पाठीमागे लालबावट्याचा रंग दिसत होता. >मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी हाऊसफुल्लमिडलक्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर संघर्ष यात्रेची सांगता सभा झाल्यामुळे येथील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात आली होती. तसेच व्हीआयपी वाहने उभे करण्याकरिता मैदानावर विशेष सोय करण्यात आली होती. यावेळी वाहतूककोंडी होवू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती.