शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नाथजोगी जातपंचायतीवर अखेर गुन्हे दाखल

By admin | Updated: November 26, 2015 03:23 IST

समाजातून बहिष्कृत करून, पुन्हा समाजात यायचे असेल तर पाच लाख रूपयांचा दंड ठोठावणाऱ्या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीविरोधात अखेर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले

वाशिम : समाजातून बहिष्कृत करून, पुन्हा समाजात यायचे असेल तर पाच लाख रूपयांचा दंड ठोठावणाऱ्या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीविरोधात अखेर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. जात पंचायतीच्या निर्दयी भूमिकेमुळे रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील एका पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.लोकमतने हे प्रकरण प्रभावीपणे उचलून धरल्यानंतर, जात पंचायतीतील जवळपास १२ ते १५ सदस्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली. सुभाष सावंत यांच्या मुलीचा विवाह गावातीलच साईनाथ शितोडे यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी झाला होता; मात्र मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळीने याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील कोल्ही येथील जात पंचायतीचे प्रमुख बापू चिमाजी सेगर यांच्याकडे तक्रार केली होती. जात पंचायतने याप्रकरणी सुभाष सावंत यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला, तसेच समाजात परत यायचे असेल, तर त्यांनी पाच लाख रूपयांचा दंड भरावा, असे फर्मान पंचांनी सोडले. हा धक्का सहन न झाल्याने सुभाष सावंत यांचा ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.मुलाच्या मृत्यूस जातपंचायतीचा निर्णय कारणीभूत असल्याची तक्रार मृताचे वडील आप्पाराणू सावंत यांनी रिसोड पोलीस स्टेशनकडे केली होती; मात्र घटनास्थळ रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत नसल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी हात झटकले. ‘लोकमत’ने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर हालचाली सुरू झाल्या.